शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वदूर पावसाचा जोर वाढणार

By admin | Updated: June 28, 2016 03:54 IST

कोकण किनारपट्टीसह मुंबईत जोर धरलेला पाऊस येत्या तीन दिवसांत राज्यात सर्वदूर धो-धो पडेल, अशी आनंदाची बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

पुणे : कोकण किनारपट्टीसह मुंबईत जोर धरलेला पाऊस येत्या तीन दिवसांत राज्यात सर्वदूर धो-धो पडेल, अशी आनंदाची बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.संपूर्ण राज्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) व्यापले असले तरी पावसाची ‘जोर’धार फक्त कोकणातच आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यातही दमदार पाऊस होत आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात काही अपवाद वगळता अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे सर्व जण दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. या भागांमध्ये बाष्पयुक्त वारे खेचण्यासाठी आणि पाऊस पडण्यासाठी हवेची आवश्यक स्थितीच निर्माण झालेली नाही. मात्र बंगालच्या उपसागरात ओडिशा व आंध्र प्रदेश राज्यांच्या किनारपट्टीजवळ हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागला आहे. तो पुढील २४ तासांत तीव्र होण्याची शक्यता असल्याने कोकणासह उर्वरित राज्यात पावसाचा जोर वाढेल, असे हवामानशास्त्र विभागाने कळविले आहे. कोकणात मुसळधार कायम असून रत्नागिरी पाठोपाठ मुरूड येथे १५०, हर्णे १४०, वेंगुर्ला १२०, रोहा ११०, मालवण येथे ९०, दापोली, वैभववाडी येथे ८०, कणकवली, सावंतवाडी, पाली, ठाणे येथे ७०, अलिबाग, गुहागर, श्रीवर्धन येथे ६०, अंबरनाथ, भिरा, कल्याण येथे ५०, डहाणू, देवगड, महाड, माथेरान, राजापूर, उल्हासनगर येथे ४० मिमी पावसाची नोंद झाली. भिवंडी, चिपळूण, मुंबई, पोलादपूर येथे ३०, कर्जत, पालघर येथे २० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा येथे ६०, महाबळेश्वरमध्ये ४०, इगतपुरी, राधानगरी, शाहूवाडी येथे २०, कवठेमहांकाळ, पन्हाळा, पुणे येथे १० मिमी पाऊस पडला. मराठवाड्यात माहूर येथे ४०, हिंगोली येथे १०, विदर्भात ब्रह्मपुरी येथे ३०, चंद्रपूर, अमरावती, नागपूर येथे १० मिमी पाऊस पडला. (प्रतिनिधी)