शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

फाशीपर्यंत पोहोचविणारच

By admin | Updated: July 25, 2016 05:07 IST

कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीगोंदा/कर्जत (अहमदनगर) : कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नराधमांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपर्डीकरांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. कोपर्डी येथील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली नाही, अशी टीका झाली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी दुपारी अचानक भेट दिली. त्यांच्या दौऱ्याबाबत काहीही पूर्वकल्पना नव्हती. ते थेट पीडित कुटुंबीयांच्या घरी सांत्वनासाठी गेले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर व त्रास होत आहे, अशी तक्रार मुलीच्या एका नातेवाईकाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याबाबत विचार करू, असे ते म्हणाले.पीडित कुटुंबाच्या घराबाहेर जमलेल्या काही लोकांशीही त्यांनी संवाद साधला. मी पीडित कुटुंबाशी सविस्तर चर्चा करून या दुर्दैवी घटनेची माहिती घेतली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असून महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. ही दुर्दैवी घटना समजल्यानंतर खूप वेदना झाल्या. सरकार म्हणून सर्व आवश्यक पावले उचलली आहेत. कुटुंबाच्या मागे सरकार उभे आहे. न्यायालयीन प्रक्रियेची मी स्वत: दररोज माहिती घेणार आहे, असे ते म्हणाले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते त्यांच्यासोबत होते. (प्रतिनिधी)गुप्तवार्ता शाखा, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कोपर्डीत होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पना नव्हती. कोणीतरी ‘व्हीव्हीआयपी’येऊ शकतात, एवढाच संदेश पोलिसांना देण्यात आला होता. त्यासाठी सकाळपासूनच बंदोबस्त वाढविला होता. मुख्यमंत्री दिल्लीहून विमानाने बारामतीत उतरले. तेथून वाहनाने ते साडेचार वाजता कोपर्डीत पोहोचले. वीस मिनिटे थांबून ते बारामतीकडे रवाना झाले. माध्यमिक शाळेची मागणी च्खा. छत्रपती संभाजीराजे यांनीही पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी आ. कपिल पाटील यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करुन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावात सातवीनंतर माध्यमिक शिक्षणाची सुविधा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणू, असे पाटील यांनी सांगितले.