शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात यापुढे ‘दारू पिण्यास बंदी विभाग’ होणार

By admin | Updated: August 9, 2016 04:28 IST

पर्यटकांकडून मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी, किनाऱ्यांवर, रस्त्यांवर, राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर खुलेआम दारू प्यायली जाते व बाटल्या, कॅन तेथेच टाकून दिले जातात

पणजी : पर्यटकांकडून मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी, किनाऱ्यांवर, रस्त्यांवर, राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर खुलेआम दारू प्यायली जाते व बाटल्या, कॅन तेथेच टाकून दिले जातात. अनेक ठिकाणी तर बाटल्या फोडल्याही जातात. अशा असंख्य तक्रारींमुळे सरकार काही जागा ‘दारू पिण्यास बंदी असलेले विभाग’ म्हणून जाहीर करणार आहे.विधानसभेत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी संबंधित विधेयक मांडले असून, त्यात अशी तरतूद आहे. खुल्या जागेत व रस्त्यांच्या बाजूने दारूच्या बाटल्या, कॅन वगैरे टाकल्यामुळे पर्यावरणाची हानी होतेच, शिवाय पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास होतो. परप्रांतांमधून आलेले लोक उघड्यावर दारू पितात व त्याचा त्रास स्थानिकांना होतो. त्यातून शांततेचा भंग होतो, तणाव निर्माण होतो, असे अबकारी ड्युटी (दुरुस्ती) विधेयक-२०१६ मध्ये म्हटले आहे. बंदी असलेल्या ठिकाणी कोणी दारू पिताना सापडल्यास, प्रथम एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. त्यानंतर, प्रत्येक वेळी दोन हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. दंडाचे प्रमाण दहा हजार रुपयांपर्यंतही वाढविता येईल, अशी तरतूद विधेयकात आहे. सरकारने विविध प्रकारे या दुरुस्ती विधेयकाद्वारे पंचवीस लाखांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित धरला आहे.याच विधेयकात फेणीची नवी स्वतंत्र व्याख्या करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. गोव्याच्या अस्मितेशी फेणी जोडली गेली आहे. त्यामुळे फेणी हे गोव्याचे हेरिटेज मद्य ठरते. फेणीचा दर्जा हा बाजारपेठेत स्कॉच, व्हिस्की व टक्वीला या बरोबरीचा व्हावा, असेही विधेयकात म्हटले आहे. फेणी व हेरिटेज स्पिरिटची व्याख्या ठरविण्यासाठी गोवा अबकारी ड्युटी कायदा, १९६४ मध्ये नव्या कलमांचा समावेश दुरुस्ती विधेयकाद्वारे केला आहे.