शशी करपे,
वसई- वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस खात्याकडून विरार आणि नालासोपाऱ्यासाठी दोन स्वतंत्र पोलीस उपअधिक्षक कार्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असून तांत्रिक पूर्तता झाल्यानंतर ही कार्यालये कार्यान्वित होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.विरार, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे, तुळींज, नालासोपारा, माणिकपूर, वालीव आणि वसई अशी सात पोलीस ठाणी वसईत असून एक पोलीस उपअधीक्षक आणि एक अपर पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय आहे. पण, १८ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वसई तालुक्यात पोलिसांची खूपच कमतरता आहे. तालुक्याचा क्राईम रेट प्रचंड वेगाने वाढत आहे. तुळींज, विरार आणि वालीव पोलीस ठाण्यात तर दरवर्षी एक हजारांहून अधिक गुन्हे नोंदवले जात आहेत. त्यामुळे ठाणी वाढल्यास पोलीसांच्या संख्येत वाढ होऊन गुन्हेगारी रोखण्यास ते सक्षम होतील. त्याचबरोबर विरार आणि नालासोपारा येथे दोन उपअधीक्षक कार्यालय झाल्यास पोलिसांचा गुन्हेगारांवर अंकुश बसेल, यासाठी पोलीसखात्याकडून दोन उपअधीक्षक कार्यालया सोबत आचोळे, पेल्हार, जुचंद्र, कामण, मांडवी आणि विरार पश्चिम अशी सहा पोलीस ठाणी निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य सरकार अनुकूल असून सरकारने विरार आणि नालासोपारा अशी दोन उपअधीक्षक कार्यालये तातडीने सुरुकरण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका पोलीस उपअधीक्षकांवर कायदा व सुव्यवस्थेचा पडणारा ताण कमी करण्यासाठीच दोनकार्यालये तातडीने सुरु करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात आले. प्रस्तावित उपविभागीय कार्यालयांसाठी जागा, हद्द निश्चिती इत्यादी तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी जिल्हा पोलीस यंत्रणेकडून वेगवान प्रयत्न सुरु असल्याचेही सांगण्यात आले.ही कार्यालये कार्यान्वित झाल्यानंतर नव्या पोलीस ठाण्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होणार आहे. आताआचोळे, पेल्हार, जुचंद्र, कामण, मांडवीआणि विरार पश्चिम अशी नवी पोलीस ठाणी तयार करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. यापैकी मांडवी, आचोळेयआणि कामण ही तीन पोलीस ठाणी तातडीने कार्यान्वित करण्याचा पय्रत्न असणार आहे. >असे झाले होते पोलीस ठाण्यांचे विभाजनयाआधी विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून अर्नाळा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. तसेच माणिकपूर पोलीस ठाण्याचे विभाजन करून वालीव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्या नंतर तुळींज नालासोपारा पोलीस ठाण्याचे विभाजन करून तुळींज पोलीस ठाणे तयार करण्यात आले.