मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या जागांमध्ये यंदा कला, वाणिज्य, विज्ञान आणि इतर शाखांमध्ये २ हजार ७१३ जागांची वाढ झाली आहे. यामध्ये कला शाखेच्या केवळ ६४ तर वाणिज्य शाखेच्या सर्वाधिक म्हणजे १ हजार ६१४ जागांची वाढ झाली आहे. परंतु गतवर्षी हजारो जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा वाढलेल्या जागांमुळे रिक्त जागांमध्ये आणखी भर पडणार आहे.मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश गेल्या काही वर्षांपासून आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश सुकर व्हावेत यासाठी शिक्षण उपसंचालक विभाग कार्यालयाकडून दरवर्षी नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांना मान्यता देण्यात येते. यंदा नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांना मान्यता देण्यात आल्याने अकरावीच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. यंदा २ हजार ७१३ जागांची वाढ झाली असल्याने अकरावी प्रवेशासाठी १ लाख ६२ हजार ८४१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. कला शाखेच्या जागांमध्ये ६४ अधिक जागांची भर पडली आहे. त्यामुळे कला शाखेच्या २३ हजार ५३५ जागा उपलब्ध आहेत. तर विज्ञान शाखेच्या जागांमध्ये १ हजार ३५ जागांची वाढ झाली असल्याने या शाखेच्या जागा ४८ हजार ७५७ पर्यंत पोहोचल्या आहेत. तर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा असलेल्या वाणिज्य शाखेच्या जागांमध्ये १ हजार ६१४ जागा वाढल्या आहेत. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या जागांमध्ये ९0 हजार ५४९ जागा उपलब्ध आहेत. गत वर्षी अकरावी प्रवेशाच्या सुमारे ७0 हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. आगामी शैक्षणिक वर्षासाठी सुमारे १ हजार ६१४ जागांची वाढ झाल्याने रिक्त राहणाऱ्या जागांमध्येही वाढ होणार आहे.उपलब्ध झालेल्या जागा२0१२-१३ : १,४९,४१५२0१३-१४ :१,५३,४७८२0१४-१५ : १,६0,१२८२0१५-१६ : १,६२,८४१
अकरावी प्रवेशाच्या २,७१३ जागा वाढल्या
By admin | Updated: May 6, 2015 04:16 IST