शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
5
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
6
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
7
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
8
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
9
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
10
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
11
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
12
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
13
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
14
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
15
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
16
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
18
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
19
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
20
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन

नालेसफाईचे पितळ उघडे पडल्याने भार्इंदरमध्ये सर्वत्र पाणीच पाणी

By admin | Updated: August 1, 2016 03:26 IST

पालिकेने केलेल्या नालेसफाईचे पितळ शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने उघड केले आहे.

भार्इंदर : पालिकेने केलेल्या नालेसफाईचे पितळ शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने उघड केले आहे. महामार्ग परिसर पाण्यात गेला होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, पालिकेच्या आपत्कालीन कक्ष, अधिकाऱ्यांशी नागरिकांनी वारंवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होत नव्हता. यामुळे त्यांच्या संतापात भर पडली. हायवे परिसरातील मुन्शी कम्पाउंड, काशीगावातील मीनाक्षीनगर, वेस्टर्न पार्क, वेस्टर्न हॉटेल, ग्रीन व्हिलेज आदी झंकार नाल्याजवळील परिसरात दोन ते तीन फूट पाणी होते. नागरिकांचा रविवार घरातील पाण्यातच काढण्यात गेला. अनेक इमारतींमध्येही पाणी शिरल्याने घरातील धान्याचे नुकसान झाले. यांच्यासाठी नगरसेविका दक्षता ठाकूर व समाजसेवक राजेंद्र ठाकूर यांनी जेवणाची सोय केली. प्रभाग समिती-६चे अधिकारी वासुदेव शिरवळकर यांनी काही ठिकाणी भेट दिली. परंतु, तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास तेही असमर्थ ठरले. मीरारोडमध्ये पूरसदृश परिस्थिती मुसळधार पावसामुळे मीरा रोड व काशिमीरा भागात पूरसृदश परिस्थिती निर्माण झाली होती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांवरून पाण्याचा लोंढा आल्याने अनेक भाग पाण्याखाली गेला. शिवाय, नैसर्गिक नाल्यांमध्ये झालेले अतिक्रमण व मातीच्या भरावाकडे पालिका व महसूल विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. मीरा गावठाण, लक्ष्मीबाग, माशाचापाडा, काशीगाव येथे पाणीच पाणी होते. माशाचापाडा भागात तर पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने अग्निशमन दलाचे जवान तळ ठोकून होते. पेट्रोलपंप पाण्याखाली गेल्याने तो बंद होता. सिल्व्हर सरिता-विनयनगर, मुन्शी कम्पाउंड, मीराधाम, कृष्णस्थळ प्लेझंट पार्क, विजय पार्क, जांगीड इस्टेट, हेतल पार्क परिसर पाण्याखाली होता. हाटकेश भागातही पाणी साचले होते. शांती विद्यानगरी, एव्हरग्रीन सिटी, हरिया पार्क, ग्रीन कोर्ट क्लब येथे भरपूर पाणी होते, तर जुन्या इमारतींमध्ये तर कमरेभर पाणी साचले होते. पाणी उपसण्यासाठी पालिकेने पंप लावले होते. मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढे पंपाचा फारसा उपयोग झाला नाही.