शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींचा पुतळा बसवतानाही झाला होता वाद!

By admin | Updated: January 5, 2017 03:40 IST

ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात बसवतानाही वाद झाला होता. आचार्य अत्रे यांनी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी

पुणे : ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात बसवतानाही वाद झाला होता. आचार्य अत्रे यांनी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी केलेल्या भाषणातही त्याचा उल्लेख केला होता. ‘त्यांचा पुतळा इतरत्र बसवता आला नाही, त्या वादात मला पडायचे नाही. गडकरी यांची अशी इच्छा होती, की माझी समाधी जर कुणी बांधली तर ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी असावी. कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थांची पायधूळ माझ्या समाधीवर उडावी, अशी त्यांची काव्यमय व भावपूर्ण कल्पना होती,’ असे आचार्य अत्रे त्या वेळी म्हणाले होते. गडकरी यांच्या पुतळ्याचे अनावरण आचार्य अत्रे यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी अत्रे यांनी केलेल्या भाषणाची आॅडिओ क्लिप महाराष्ट्र कलोपासक संस्थेकडे उपलब्ध होती. संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकुरदेसाई यांनी ती ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली. वाचकांसाठी हे संपूर्ण भाषण देत आहोत. महान ऐतिहासिक घटना या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी महान साहित्यकार, मराठी रंगभूमीवर नवयुग प्रवर्तणारे, स्वतंत्र प्रतिभेचे नामवंत नाटककार आणि महाराष्ट्रामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी आणलेल्या विनोदाच्या तत्त्वज्ञानाचा घरोघरी प्रचार करणारे, विनोद पंडित राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा आज संभाजी उद्यानात उभारला जात आहे. आज हे पवित्र काम करण्याकरिता मला पाचारण केले, हा माझ्या आयुष्याचा सर्वांत मोठा सन्मान समजतो. सर्व सन्मानांपेक्षा माझ्या गुरूंचा पुतळा आपण उभारायला सांगितल्यामुळे मी महापालिकेचा ऋणी आहे. गडकरी यांना जाऊन ४३ वर्षे झाली. पुणे ही त्यांची कर्मभूमी होती. त्यांचा पुतळा इतरत्र बसवता आला नाही, त्या वादात मला पडायचे नाही. गडकरी यांची अशी इच्छा होती, की माझी समाधी जर कुणी बांधली तर ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी असावी. कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थांची पायधूळ माझ्या समाधीवर उडावी, अशी त्यांची काव्यमयव भावपूर्ण कल्पना होती. ही इच्छा जर साकार झाली असती, तर आम्हा सर्वांना आनंद झाला असता. मी कठोर बोलू शकतो; पण आजचा दिवस कठोर बोलण्याचा नाही. संभाजी उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला, ही गोष्ट वाईट झाली नाही. ज्या संभाजीच्या चरित्रावर गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ हे नाटक लिहिले त्याच्या नायकाचे नाव ज्या उद्यानाला दिले आहे, त्या उद्यानात गडकरी यांचा पुतळा उभारला जावा, हाही मोठा योगायोग आहे. १९३८मध्ये जेव्हा मी पुणे नगरपालिकेचा चेअरमन होतो, तेव्हा या उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ माझ्या हस्ते झाली, त्याच उद्यानात माझ्या गुरूंच्या पुतळ्याचे माझ्याच हस्ते अनावरण होत आहे, हाही एक मोठा योगायोग अनपेक्षित आहे. आणखी एक योगायोग आहे. ओंकारेश्वर हे गडकरी यांचे आवडते मंदिर. पुण्याला असताना रोज संध्याकाळी ओंकारेश्वराच्या दर्शनाला आले नाहीत, असे कधी व्हायचे नाही. लोक त्यांना म्हणत, ते भित्रे होते; पण तसे नव्हते. मी दोन-चार वेळेला ओंकारेश्वर मंदिरात आलेलो होतो. म्हणून, ते अशा ठिकाणी बसले आहेत, त्यांचा आवडता ओंकारेश्वर त्यांच्या समीप आहे. तिथेच त्यांचा पुतळा उभरला जात आहे, याचे त्यांच्या आत्म्याला समाधान वाटत असेल. -आचार्य अत्रे