शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘टोलबंदी’वरून अजूनटोलवाटोलवीच

By admin | Updated: August 12, 2014 01:08 IST

टोल टॅक्स माफ करावा, अशी मागणी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे वारंवार केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा केली

मुंबई : टोल टॅक्स माफ करावा, अशी मागणी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे वारंवार केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा केली. या टोलनाक्यांमधून एसटीबरोबरच सर्वच वाहनांना टोल टॅक्स माफ करण्यात आला. मात्र राज्य सरकारने केलेली घोषणा अद्याप कागदावरच असून, कुठलाही शासन निर्णय झालेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजूनही या टोल टॅक्सबाबत टोलवाटोलवीच सुरू असून एसटीला त्याचा भुर्दंड पडतच आहे. एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक संकटात असून, याची ओरड महामंडळाकडून सातत्याने केली जात आहे. सवलती, डिझेलचा वाढत जाणारा खर्च, घटत चाललेले प्रवासी आणि अन्य काही कारणांमुळे एसटीवरील आर्थिक संकट वाढतच जात आहे. त्याचप्रमाणे महामंडळासमोर सर्वांत मोठी डोकेदुखी ठरत आहे ती टोल टॅक्सची. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पोहोचलेल्या या सेवेला लांब पल्ल्याच्या प्रवासात टोल टॅक्सला सामोरे जावे लागत आहे. या टोल टॅक्समुळे प्रत्येक वर्षी एसटी महामंडळ त्याच्या ओझ्याखाली दबत चालले आहे. महामंडळाच्या बसेसना जवळपास २२२ टोलनाक्यांतून जावे लागते. त्याचा मोठा फटका मंडळाला बसतो. गेल्या सहा वर्षांत तर महामंडळाने भरलेला टोल हा वाढतच गेला आहे. २00८-0९ साली एसटी महामंडळाकडून तब्बल ६0 कोटी ९७ लाख रुपये टोल टॅक्सपोटी भरण्यात आले होते. २0१३-२0१४ साली हाच आकडा जवळपास १३२ कोटी रुपये एवढा झाला. त्यामुळे टोलनाक्यातून वगळण्यात यावे अशी मागणी एसटी महामंडळाकडून केली जात होती. तर अनेक राजकीय पक्षांकडूनही टोल टॅक्स माफ करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सरकारकडून ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय झाला. यात ३४ टोलनाके हे एमएसआरडीचे तर उर्वरित १० टोलनाके हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होते. अन्य वाहनांबरोबरच एसटीलाही या टोलनाक्यांमधून माफ करण्यात आले होते. यामुळे एसटीची वर्षाला जवळपास ४0 कोटी रुपयांची बचत होणार होती. त्यानंतरही या टोलनाक्यांमधून सूट देण्यात आल्याची घोषणा अनेकदा सरकारकडून करण्यात आली. मात्र याबाबत शासन निर्णयच जाहीर झालेला नसल्याची बाब समोर आली आहे. (प्रतिनिधी)