शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे

By admin | Updated: March 29, 2016 01:20 IST

मराठी भाषिकांच्या राज्यासाठी मोठा संघर्ष झाला. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्र एकसंध राहावे, शिवाय बेळगाव, बीदर, भालकीचा भाग राज्यात सामील होण्यासाठी प्रयत्न व्हायला

- नजीर शेख,  औरंगाबादमराठी भाषिकांच्या राज्यासाठी मोठा संघर्ष झाला. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्र एकसंध राहावे, शिवाय बेळगाव, बीदर, भालकीचा भाग राज्यात सामील होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात काही कार्यकर्ते वगळता नेत्यांमध्ये व राजकीय वर्तुळात वेगळ््या राज्याची चर्चा नाही; परंतु मराठवाड्याला विकासात डावलल्याची भावना आहे. दुसरीकडे बेळगाव, निपाणी, बीदर, भालकीसह महाराष्ट्र राज्य असायला हवे, म्हणून ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यासह कार्यकर्ते ५६ वर्षे लढा देत आहेत. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. फाजल अली कमिशनने वेगळ््या विदर्भाच्या मागणीची शिफारस केली आहे. मात्र, मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावे, अशी कोणतीही शिफारस नाही. मराठी भाषिकांचे एकच राज्य व्हावे या हेतूने नागपूर करार झाला. आता त्याची अंमलबजावणी किती झाली, हा अभ्यासाचा विषय आहे. स्वतंत्र विदर्भची भूमिका मांडणारे नासिकराव तिरपुडे, जांबूवंतराव धोटे, बनवारीलाल पुरोहित यांना ठसा उमटविता आला नाही. तर स्वतंत्र राज्याच्या विषयावर मराठवाड्यातील नेते बोलत नाहीत, असे एन. डी. पाटील यांनी सांगितले.अखंड महाराष्ट्रातच आमचे हित आहे. महाराष्ट्राचे तुकडे पडणार असतील तर आम्हाला कुणाचा आधार राहणार, असे समितीचे बेळगावचे आ. संभाजी पाटील म्हणाले. कर्नाटकमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून दुय्यम नागरिकाचे जिणे जगत आहोत. येथे प्रत्येक शाळा कानडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र एक राहिला तर महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीला महत्त्व आहे, असे बीदरचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामराव राठोड यांनी सांगितले.आमच्याप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्याचीही लोकभावना असू शकते. मात्र, सीमा भागातील नागरिकांचा लढा हा संस्कृती आणि भाषेचा आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्याचा विकासाच्या मुद्द्यावर आहे. दोन्ही विभागांचा विकास झाल्यास त्यांची मागणी पुढे जाणार नाही, असे मत समितीचे बेळगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केले.