शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने पडलेल्या वृक्षांना वाली नाही

By admin | Updated: May 18, 2016 00:57 IST

‘झाडे लावा, झाडे वाढवा’ असा घोष करणाऱ्या महापालिकेकडे पावसाने उन्मळून पडलेल्या वृक्षांची व्यवस्था लावण्यासाठी मात्र कोणतीही ठोस यंत्रणा नाही

पुणे : ‘झाडे लावा, झाडे वाढवा’ असा घोष करणाऱ्या महापालिकेकडे पावसाने उन्मळून पडलेल्या वृक्षांची व्यवस्था लावण्यासाठी मात्र कोणतीही ठोस यंत्रणा नाही. असा एखादा वृक्ष रहदारीच्या रस्त्यावर पडला तर त्याचा पसारा बाजूला करून रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी कोणाची यावरून पालिकेच्या अग्निशमन दल व उद्यान विभागात वाद होतात. प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी शहरात फिरून पाहणी करून धोकादायक वृक्षांची नोंद करण्याचा नियम असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यंदाही पालिकेकडे अशी कोणतीही नोंद नाही.सन २०१३च्या वृक्षगणनेनुसार पालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक तसेच खासगी जागांवरील वृक्षांची संख्या ३८ लाख आहे. यातील अनेक वृक्ष कित्येक वर्षे जुने आहेत. विविध उद्यानांमधील वृक्षांबरोबरच शहरातील भांडारकर, कर्वे, जंगलीमहाराज अशा अनेक रस्त्यांवरील वृक्षांचा त्यात समावेश आहे. मोठा वादळी पाऊस झाला तर शहरात अनेक ठिकाणी असे वृक्ष उन्मळून पडतात. संपूर्ण वृक्ष पडला नाही तरी त्याच्या फांद्या मोडून पडतात. गर्दीच्या रस्त्यावर असा प्रकार झाला तर त्यातून अपघात होतात. वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला वृक्ष त्वरित हलवला नाही तर त्यातून वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पावसाने पडलेले असे वृक्ष हलवण्याची जबाबदारी उद्यान विभागाची की अग्निशमन विभागाची असा वाद महापालिकेत आहे. त्यातून अनेकदा कोणीच ही जबाबदारी घेत नाही. शहरातील उद्याने, वृक्ष प्राधिकरण उद्यान विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ही जबाबदारी उद्यान विभागाचीच असे अग्निशमन दलाचे तर आपत्तीच्या प्रसंगी धावून जाण्याचे काम अग्निशमन दलाचे असे उद्यान विभागाचे म्हणणे आहे. वृक्ष पडलेल्या ठिकाणाचे नागरिक फोनवर माहिती देण्याचा प्रयत्न करतात त्या वेळी या दोन्ही विभागांकडून त्यांना परस्परांचा दूरध्वनी क्रमांक देऊन तिथे तक्रार करण्यास सांगितले जाते.पडलेली झाडे उचलण्यासाठी उद्यान विभागात पूर्वी ठेकेदार नियुक्त केले जात असत. या विभागाकडे वाहनांची, मनुष्यबळाची, फांद्या कापण्यासाठीच्या अत्याधुनिक साधनांची कमतरता आहे. त्यामुळेही त्यांच्या कामावर मर्यादा येतात. विशेषत: एकाच वेळी अनेक ठिकाणी वृक्ष पडण्याच्या घटना घडतात, त्यावेळी त्यांची धावपळ होते. ठेकेदार नियुक्तीसाठी या विभागाने प्रशासनाकडे परवानगी मागूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पडलेल्या झाडाखाली कोणी अडकले, फांद्या पडण्यामुळे भिंत वगैरे कोसळून अपघात झाला तर अशा आपत्तीच्या वेळी अग्निशमन दलाची जबाबदारी आहे असे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात न घेता प्रत्येक वेळी कुठेही वृक्ष पडण्याची घटना घडली, किंवा एखाद्या वृक्षाची फांदी कापायची असेल तरीही त्यांच्याकडून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले जाते. पदाधिकारी, नगरसेवकही त्यांच्या प्रभागांमध्ये असा काही प्रकार झाला की लगेच अग्निशमन विभागालाच फोन करतात. ही मूळ जबाबदारी उद्यान विभागाची आहे याचाच सर्वांना विसर पडला असल्याची या विभागाची तक्रार आहे.(प्रतिनिधी)