शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘उजनीमध्ये तूर्तास पाणी नाहीच’

By admin | Updated: December 4, 2015 00:54 IST

दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या सोलापूरची तहान भागवण्यासाठी जलस्रोत नियंत्रण प्राधिकरणाने पुण्याच्या चार मुख्य धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्याचा दिलेला

मुंबई : दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या सोलापूरची तहान भागवण्यासाठी जलस्रोत नियंत्रण प्राधिकरणाने पुण्याच्या चार मुख्य धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्याचा दिलेला आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने रद्द केला. पाणी सोडण्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्राधिकरणाच्या एका सदस्याचे यामध्ये हितसंबंध असल्याचे निदर्शनास आल्यावर खंडपीठाने प्राधिकरणाला १४ डिसेंबर रोजी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे उजनीमध्ये तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही.जलस्रोत नियामक प्रशासनाने २६ आॅक्टोबर रोजी पुण्याच्या मुळशी, चासकमान, आंध्रा आणि भीमा आसखेड या धरणांतून उजनी धरणात १० टीमएमसी पाणी सोडण्याचा आदेश पुणे विभागीय आयुक्तांना दिला. मात्र त्याला पुण्याचे आमदार सुरेश गोरे आणि मूळशी ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र खंदारे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या दोन्ही याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती.प्राधिकरणाचे सदस्य एस.पी. सोडल यांचे यामध्ये हितसंबंध आहेत, हे माहीत असतानाही प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी का नाही निर्णय घेतला? पाणी सोडण्याच्या निर्णय प्रक्रियेत अध्यक्षही भाग घेऊ शकतात. मात्र आत्तापर्यंत ते सहभागी झाल्याचे दिसले नाही. लाखो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्याने अध्यक्षांनी या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे, असे मत खंडपीठाने व्यक्त करत अध्यक्षांच्या कामावर नाराजी व्यक्त केली.सोडल यांनाही या निर्णयामुळे लाभ होणार असल्याचे बुधवारी न्यायालयात मान्य केले. त्यामुळे हा निर्णय कायद्याच्या कसोटीला उतरत नाही, असे म्हणत खंडपीठाने २६ आॅक्टोबरचा प्राधिकरणाचा निर्णय रद्द केला. मात्र लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने खंडपीठाने प्राधिकरणाला १४ डिसेंबर रोजी नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला. सगळ्यांनी १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्राधिकरणापुढे सुनावणीसाठी उपस्थित राहावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने याबाबत प्राधिकरण ८ ते १० दिवसांत निर्णय घेईल, अशी आम्हाला आशा आहे, असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)