शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

मिरजेत पाण्याची रेल्वे पोहोचली

By admin | Updated: April 9, 2016 22:33 IST

लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्याहून निघालेले रेल्वे टँकर मिरजेत शनिवारी रात्री पोहोचले. मिरज स्थानकातील यंत्रणेमार्फत टँकर भरण्याची क्षमता नसल्याने चार दिवसात

जलवाहिनीचे काम सुरू : लातूरला पाण्यासाठी आणखी चार दिवसांची प्रतीक्षा 

मिरज : जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर लातूरला पाणी पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी रेल्वे जलशुध्दीकरण केंद्रापासून यार्डापर्यंत जलवाहिनीच्या कामाचा प्रारंभ जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आला. लातूरला मिरजेतून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. कृष्णा नदीतून उचललेले पाणीच थेट रेल्वेत भरले जाणार आहे. एक रेल्वे ५० टँकरची असून प्रत्येक टँकर पन्नास हजार लिटरचा आहे. त्यासाठी रेल्वे पाणीपुरवठा केंद्रापासून यार्डापर्यंत १ कोटी ८४ लाख खर्चून अडीच किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकारणामार्फत करण्यात येणाऱ्या या कामासाठी टंचाई निधीतून मंजुरी रखडली असल्याने वरिष्ठ पातळीवरून हालचाली होऊन शनिवारी काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासनाकडून जलवाहिनीच्या आराखड्यास तांत्रिक मंजुरी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी गायकवाड यांनी रेल्वेस्थानकात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. जलशुध्दीकरण केंद्रास भेट देऊन जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली. रेल्वे टँकर मिरजेपर्यंत पोहोचले तरी जलवाहिनीच्या कामास सुरुवात नसल्याने जिल्हाधिकारी गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी जीवन प्राधिकरण व रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलवाहिनीच्या कामाचा प्रारंभ केला. हे काम पूर्ण होण्यास चार दिवस लागणार असल्याने तोपर्यंत मिरजेत पोहोचलेले ५० टँकर भरून लातूरला पाठविण्यासाठी रेल्वेच्या उपलब्ध यंत्रणेचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले. रेल्वेच्या जुन्या जलवाहिनीव्दारे स्थानकातील प्लॅटफॉर्म दोनवरून पाणी भरण्यासाठी प्लॅटफॉर्म दोनवर येणाऱ्या प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलून अन्य प्लॅटफॉर्मकडे वळविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकांशी चर्चा केली. रविवारी रात्रीपर्यंत टँकरमध्ये पाणी भरून सोमवारी ते लातूरला पाठविण्याचे प्रयत्न सुरू असताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्लॅटफॉर्मवरून पाणी भरण्यास नकार दिला. त्यामुळे मिरजेत रेल्वे टँकर उपलब्ध झाल्यानंतरही लातूरकरांना पाण्यासाठी आणखी चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली....

जलवाहिनी खोदाईस शनिवारी सुरुवात झाली. रेल्वेकडून तांत्रिक मान्यता मिळविण्यासाठी आराखडा सादर करण्यात आला. रेल्वे यार्डात सिग्नल यंत्रणेचे जाळे असल्याने तेथे खोदकाम करण्यास अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने एक हजार मिटर लांबीची लोखंडी जलवाहिनी जमिनीवरून नेण्यात येणार आहे. जलशुध्दीकरण केंद्रापासून जलवाहिनीसाठी पीव्हीसी पाईप मिळत नसल्याने पाईप उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रेल्वेच्या यंत्रणेमार्फत आलेले टँकर रात्री दहा ते पहाटे तीनपर्यंत सहा तास भरण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी ५० टँकर पाणी भरून रेल्वे लातूरला पाठविण्याचे नियोजन सुरू होते. मात्र सायंकाळी अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या यंत्रणेमार्फत २५ लाख लिटर पाणी भरण्याची क्षमता नसल्याने टँकर भरण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे आता चार दिवसात जलवाहिनीचे काम पूर्ण करून टँकर पाठविण्यात येणार आहेत.

विभागीय व्यवस्थापकांकडून पाहणी....

 रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक दादा भोय यांनीही मिरजेतील पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी केली. यार्डापर्यंत जलवाहिनीच्या तांत्रिक मान्यतेसाठी आराखडा पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. व्यवस्थापक सकाळी कोल्हापूरला रवाना झाल्याने त्यांची व जिल्हाधिकाऱ्यांची भेट होऊ शकली नाही. मिरज स्थानकात अधिकाऱ्यांसोबत निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी बैठक घेतली. याप्रसंगी स्थानक अधीक्षक व्ही. रमेश, मकरंद देशपांडे, गजेंद्र कुल्लोळी, संदीप शिंदे, रोहित चिवटे, मनोहर कुरणे, ज्ञानेश्वर पोतदार उपस्थित होते.