शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन’ विरोधात सबळ पुरावे नाहीत

By admin | Updated: October 27, 2016 02:52 IST

सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ घोषित करून, तिच्यावर बंदी घालण्याइतपत समाधानकारक पुरावे राज्य सरकारकडून मिळाले नाहीत, अशी माहिती बुधवारी केंद्र

मुंबई : सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ घोषित करून, तिच्यावर बंदी घालण्याइतपत समाधानकारक पुरावे राज्य सरकारकडून मिळाले नाहीत, अशी माहिती बुधवारी केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली. त्यावर सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी, गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारशी काय पत्रव्यवहार केला, अशी विचारणा करत, सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. पनवेल आणि ठाणे येथे बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी विजय रोकडे यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर, २०१२ मध्ये राज्य सरकारने सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करून, बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला. चार वर्षे उलटूनही केंद्र सरकारने या प्रस्तावावर काहीही निर्णय घेतला नाही.याबाबत केंद्र सरकारने खंडपीठाला सांगितले की, सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारकडून आलेल्या पुराव्यांची छाननी केली असता, त्या आधारावर संस्थेवर बंदी घालता येणार नाही असे लक्षात आले. त्यामुळे आणखी माहिती सादर करण्यासंदर्भात पत्र पाठवले. मात्र, राज्य सरकारने यावर काहीही प्रतिसाद दिलेला नाही, असे केंद्र सरकारने सांगितले. (प्रतिनिधी) पत्रव्यवहार दाखवाआम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये झालेला पत्रव्यवहार दाखवा. केवळ तोंडी सांगून जमणार नाही. केंद्र व राज्य सरकारने त्यांच्याकडे असलेली पत्रे चार आठवड्यांत न्यायालयात सादर करावी,’ असे निर्देश खंडपीठाने दिले. राज्य सरकारच्या कायद्यांतर्गत नोंद करण्यात आलेल्या संस्थेवर केंद्र सरकार कोणत्या कायद्यांतर्गत बंदी घालणार? असा प्रश्नही उच्च न्यायालयाने उपस्थित केला.