शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत अजूनही ‘शिवशाही’ अवतरलीच नाही

By admin | Updated: May 7, 2016 02:19 IST

एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करीत भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बसेसची घोषणा केली. मात्र ही घोषणा करून तीन महिने उलटले तरी या बस अद्याप ताफ्यात दाखल

- सुशांत मोरे,  मुंबईएसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करीत भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बसेसची घोषणा केली. मात्र ही घोषणा करून तीन महिने उलटले तरी या बस अद्याप ताफ्यात दाखल झाल्या नाहीत. गर्दीचा हंगाम सुरू झाला असून, शिवशाही बस याच हंगामात सुरू करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाचा होता. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १७ हजार बस आहेत. यात जवळपास १00 पेक्षा जास्त एसी बस असून मुंबई ते पुणे, औरंगाबादसह अन्य काही मोजक्याच मार्गांवर त्या धावतात. प्रवाशांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळावी आणि जास्तीत जास्त प्रवाशांना एसी बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आणखी काही एसी बसेस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला होता. त्यानुसार ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस या दोन सेवा प्रकारांचा समावेश असलेल्या ५00 बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या बस ताफ्यात आणण्यापूर्वी त्यांचे ‘शिवशाही’ असे नामकरणही करण्यात आले. २0१६ च्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्ताने मुंबई सेन्ट्रल येथे काही योजनांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अजूनही एसटीच्या ताफ्यात एकही शिवशाही बस दाखल झालेली नाही. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, एकही शिवशाही एसी बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाली नसल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र त्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवशाही बस या टप्प्याटप्प्यात १५ ते २0 या प्रमाणे एसटीच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील, असे ते म्हणाले.