शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शालेय प्रवेशाचे वेळापत्रक नाहीच

By admin | Updated: January 16, 2015 05:50 IST

राज्य शिक्षण मंडळ तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांच्या प्रवेशाचे वेळापत्रक वेगवेगळे असून, सर्व शाळांनी एका विशिष्ट कालावधीमध्येच प्रवेश प्रक्रिया राबवावी

पुणे : राज्य शिक्षण मंडळ तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांच्या प्रवेशाचे वेळापत्रक वेगवेगळे असून, सर्व शाळांनी एका विशिष्ट कालावधीमध्येच प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे बंधन शाळांवर घालता येणार नाही. मात्र, शुल्क नियंत्रण कायद्यानुसार सर्व शाळांवर शुल्क आकारणीबाबत निर्बंध घालता येतील, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी सांगितले. परिणामी, पाल्यांच्या शाळाप्रवेशासाठी पालकांना करावी लागणारी फरफट यापुढील काळातही थांबणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.पाल्याच्या शाळाप्रवेशासाठी पालकांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच तयारीला लागावे लागते. अलीकडच्या काळात बहुतांश शाळांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. परंतु, केवळ प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी पालकांना शाळांच्या प्रवेशद्वारावर पहाटेपासूनच रांगा लावाव्या लागत होत्या. त्यातही सीबीएसई व आयसीएसई बोर्ड स्वतंत्रपणे प्रवेश प्रक्रिया राबवितात. परिणामी, शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची फरफट होते. मात्र, काही वर्षांपासून सर्व शाळांच्या प्रवेशाचे एकच वेळापत्रक असावे, याबाबत शालेय शिक्षण विभागातर्फे चर्चा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तावडे यांना विचारले असता, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रतक तयार करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषद, बालभारतीच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांची तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सदस्यांची गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यात अभ्यास मंडळाच्या सदस्यांच्या निवडीबाबत आॅनलाइन यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला.