शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घर विक्रीला प्रतिसाद नाही

By admin | Updated: October 31, 2016 02:45 IST

दसऱ्यापाठोपाठ दिवाळीतही घर खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने विकासक हवालदिल झाले आहेत.

नवी मुंबई : दसऱ्यापाठोपाठ दिवाळीतही घर खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने विकासक हवालदिल झाले आहेत. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी जाहिर केलेल्या विविध आकर्षक योजनाही फोल ठरल्या आहेत. त्यामुळे वर्षेनुवर्षे पडून असलेल्या मालमत्तांचे करायचे काय, असा सवाल शहरातील विकासकांना पडला आहे. नवी मुंबईत दिवसेंदिवस घरांची मागणी वाढत आहे. परंतु शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने स्वस्त व परवडणारी घरे बांधणे विकासकांना अवघड होऊन बसले आहे. मागणी व पुरवठा यात मोठ्याप्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षापासून घरांची मागणी कमलाची मंदावली आहे. मालमत्ता विकल्या न गेल्याने बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये अडकून पडले आहेत. त्यामुळे रियल इस्टेट मार्केटवर चिंतेची काजळी पसरली आहे. परंतु अंतराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, नैना क्षेत्रातील प्रस्तावित पयाभूत सुविधा व नव्यानेच स्थापण झालेली पनवेल शहर महापालिका आदीबाबी बांधकाम उद्योगाला दिलासा देणाऱ्या ठरल्या आहेत. याचा परिणाम म्हणून गेली तीन-चार वर्षे केवळ प्रतिक्षेत असणारा ग्राहक आता बाहेर पडेल, असा विकासकांचा व्होरा आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीचा मुहर्त विकासकांना अशादायी वाटत होता.परंतु दसऱ्या पाठोपाठ दिवाळीतही ग्राहकांनी घर खरेदीला अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने रियल इस्टेट क्षेत्रात पुन्हा चिंतेची काजळी पसरली आहे. विशेष म्हणजे अनेकांनी ग्राहकाअभावी धूळ खात पडून असलेल्या आपल्या मालमत्ता विक्रीसाठी काढल्या आहेत. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना जाहिर केल्या होत्या. काहींनी तर घर खरेदीसाठी नोंदणी रकमेवर चक्क डिस्काउंट देवू केले आहे. तर अनेकांनी आपल्या नवीन गृहप्रकल्पातील घर नोंदणीवर आकर्षक सवलत जाहिर केल्या होत्या. परंतु ग्राहकांनी पाठ फिरविल्याने या सर्व योजना फोल ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)>३0 हजार मालमत्ता विक्रीअभावी पडूनमागील काही वर्षात मालमत्तांच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरविली आहे. याचा प्रत्यक्ष फटका रियल इस्टेट मार्केटला बसला आहे. कारण गेल्या काही वर्षापासून विविध क्षेत्रफळाच्या सुमारे तीस हजार मालमत्ता विक्रीअभावी पडून असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यात हजारो कोटींची गुंतवणूक असून त्यामुळे गुंतवणूकदार आणि विकासक धास्तवले आहेत.