शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

दप्तराच्या ओझ्यातून यंदा मुक्ती नाहीच !

By admin | Updated: July 5, 2015 02:15 IST

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या समितीने त्यांच्या शिफारशी शुक्रवारी उच्च न्यायालयात सादर केल्या. या शिफारशींची अंमलबजावणी कधी होणार

- हायकोर्टाचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश

मुंबई : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या समितीने त्यांच्या शिफारशी शुक्रवारी उच्च न्यायालयात सादर केल्या. या शिफारशींची अंमलबजावणी कधी होणार याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला दिले आहेत. या शिफारशी बघितल्या असता यंदा दप्तराच्या ओझ्यातून मुक्तता होणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमारे या शिफारशी सादर करण्यात आल्या. त्यावर न्यायालयाने समाधानही व्यक्त केले. या शिफारशींमध्ये समितीने दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणामही नमूद केले आहेत. यावर न्यायालयातर्फे चिंता व्यक्त करण्यात आली. दप्तराने विद्यार्थ्यांना आजार होत असतील तर भविष्यात हे टाळण्यासाठी त्यांना ट्रॉली बॅग घ्यावी लागेल, असा टोला न्यायालयाने हाणला. यंदाचे शैक्षणिक वर्ष तर सुरू झाले. तेव्हा याची अंमलबजावणी कधी होणार, हे शासनाने स्पष्ट करावे, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी चेंबूर येथील स्वाती पाटील यांनी अ‍ॅड. नीतेश नेवसे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी)