शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीने स्वखुशीने शरीरसंबंध ठेवल्यास बलात्कार नाही - विशेष न्यायालय

By admin | Updated: January 18, 2016 17:02 IST

अल्पवयीन मुलीने प्रेमप्रकरणामध्ये स्वखुशीने शरीरसंबंध ठेवले असतील तर पौढ आरोपीस दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच मुंबईतील न्यायालयाने दिला

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १८ - अल्पवयीन मुलीने प्रेमप्रकरणामध्ये स्वखुशीने शरीरसंबंध ठेवले असतील तर प्रौढ आरोपीस दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच मुंबईतील न्यायालयाने दिला आहे. अल्पवयीन मुला-मुलींविरोधात घडणा-या लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. एका प्रकरणात अल्पवयीन मुलीचे प्रौढ आरोपीसोबतचे शारीरीक संबंध प्रेम प्रकरणातून होते, त्याला बलात्कार ठरवता येणार नाही असा निकाल देत आरोपीची निर्दोष सुटका केली. 
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार या  प्रकरणातील मुलगी ६ ऑक्टोंबर २०१३ रोजी बेपत्ता झाली होती. बाजारात जाते सांगून घराबाहेर पडलेली ही मुलगी बेपत्ता झाली होती. या मुलीला आरोपी चेतन गायकवाड सोबत शेवटचे पाहण्यात आले होते. दोघांच्या हातात बॅगा होत्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात आधी अपहरणाचा नंतर अल्पवयीनांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) या कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. 
आरोपी गायकवाडसोबत मुलगी परतल्यानंतर पोलिसांनी मुलीची जबानी नोंदवून घेतली, तिची वैद्यकीय तपासणी केली आणि आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. १४ जानेवारीला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एसकेएस रझवी यांनी आरोपी गायकवाडची अपहरण, बलात्काराच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली आणि पोलिसांना आरोपीचा मुद्देमाल परत करण्याचे आदेश दिले. 
अल्पवयीन मुलीचे गायकवाडसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. त्यामुळेच ती आई-वडिलांना न सांगता घरातून पळून गेली. दोघे पुणे, नाशिक, उदयपूर येथे गेले, तिथे लॉजवर राहिले. परस्पर सहमतीने त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मुलगी स्वेच्छेने आरोपीसोबत गेली, राहिली व शरीरसंबंध ठेवले. मुलीला आरोपीसंबंधी कोणतीही तक्रार नाही. ती स्वेच्छेने आरोपीसोबत गेली होती. तिने आरोपीला सहकार्य केले त्यामुळे शिक्षा सुनावण्याचा प्रश्नच येत नाही असा निकाल न्यायालयाने दिला. आरोपीच्या सुटकेसाठी कायदेतज्ञांनी पोलिसांना जबाबदार धरले आहे.