शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

माणदेशात अवकाळी पाऊस, साताऱ्यात घामाच्या धारा

By admin | Updated: March 31, 2017 18:58 IST

अंगातून घामाच्या धारा वाहू लागलेल्या असतानाच शुक्रवारी सायंकाळी खटावमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली

आॅनलाइन लोकमतसातारा/खटाव, दि. 31 - सातारा शहरासह जिल्हा कडक उन्हामुळे तापलेला असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागलेल्या असतानाच शुक्रवारी सायंकाळी खटावमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे खटावमधील ग्रामस्थ सुखावले.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या खटाव ग्रामस्थांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने दिलासा मिळाला. दुपारी तीनपासूनच काळ्या ढगांनी आभाळ भरून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हवेत अधिकच उष्मा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साठले होते.दिवसभर उकाड्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांना या पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळाला. तर उन्हाळ्यात पडलेला पाहिलाच पाऊस असल्याने लहान मुले व तरुणांनी पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. खटाव तालुक्यातील वर्धनगडपासून पुसेगाव परिसरात काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. बुधलाही ढगाळ वातावरण तयार होऊन अधूनमधून थेंब पडत होते. त्यामुळे पावसाची चिन्हे निर्माण झाली होती.उर्वरित सातारा, फलटण, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कऱ्हाड, जावळी, पाटण तालुक्यांमध्ये मात्र सलग चौथ्या दिवशीही सूर्य आग ओकत होता. सरासरी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी तीनच्या सुमारास काळे ढग जमा झाले होते. सातारा शहरात सलग दुसऱ्या दिवशीही दुपारी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. घरोघरी व शासकीय कार्यालयांमध्ये पंखे, वातानुकूलित यंत्रणा, कुलर यांचाच आधार घ्यावा लागत आहे. अंभेरीत शेतात पाणी; ओढे, नाले तुडुंबचौकीचा आंबा परिसरातील अंबेरी येथे सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतात पाणी साठले होते. तर ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची पळापळ झाली.कांदा झाकण्यासाठी गडबडखटाव परिसरात दुपारी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर शेतात काम करणाऱ्या मजुरांची एकच तारांबळ उडाली होती. कांदा काढणीची लगबग सुरू असल्याने कांदा सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड झाली.