शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणात दोषींना पॅरोल नाही - राज्य सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 12:49 IST

बलात्कार प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा भोगणा-या दोषींची यापुढे पॅरोलवर सुटका होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - बलात्कार प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा भोगणा-या दोषींची यापुढे पॅरोलवर सुटका होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने दिला आहे. अ‍ॅड. पल्लवी पूरकायस्थ हत्या करणारा सज्जाद मुघल हा पॅरोलवर असतानाच फरार झाल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 
वडाळयाच्या भक्ती पार्कमध्ये १६ व्या मजल्यावर रहाणा-या पल्लवीची ९ ऑगस्ट २०१२ रोजी सज्जादने अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली होती. या हत्येविरोधात समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारने जलदगती न्यायालयात हा खटला चालवला. सज्जादला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली व त्याला नाशिक कारागृहात पाठवले.
सज्जादने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पॅरोलसाठी अर्ज केला होता. विभागीय आयुक्तांनी त्याचा पॅरोल मंजूर केल्यानंतर तो एप्रिलच्या अखेरीस तीस दिवसांसाठी बाहेर आला पण त्यानंतर तो तुरुंगात परतलाच नाही. या प्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला.
सज्जादने ९ ऑगस्टच्या रात्री पल्लवीच्या फ्लॅटचा वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर त्याने पल्लवीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करुन तिची हत्या केली होती.  वडाळ्यातील एका उच्चभ्रू सोसाटीत राहणा-या पल्लवीचा मृतदेह आढळला होता. या घरात पल्लवी तिचा प्रियकर अविक सेनगुप्तासोबत राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी सज्जादला अटक केली होती. 
खून, घुसखोरी व विनयभंगाचे आरोप लावण्यात आले होते. पल्लवीवर सज्जादची पहिल्यापासून वाईट नजर होती़ त्या रात्री ती घरात एकटीच होती़ त्या वेळी सज्जादने जाणीवपूर्वक लाइट बंद केले व घरात घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला़ पण तिने प्रतिकार केल्याने सज्जादने तिचा खून केला होता.
 
आणखी वाचा : 
( वकिल पल्लवी पूरकायस्थाचा मारेकरी फरार)
(पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी सज्जादला जन्मठेप)
  •  
 
  •