शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 25, 2017 07:49 IST

राष्ट्रपतीपदासाठी आज तरी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती आम्हाला दिसत नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना खुला पाठिंबा दर्शवला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर आडवाणींच्या मानगुटीवर बाबरीचे भूत बसवून सर्वोच्च न्यायालयानेच एक तगडा स्पर्धक कमी केला. त्यामुळे मुरली मनोहर जोशी हे सरसंघचालकांच्या गुप्त भेटीस जाऊन काही नवे गणित जुळवीत आहेत काय? अशी ‘गुप्त’ चर्चा उघडपणे सुरू आहे. सरसंघचालकांनी मनावर घेतले तर काहीही घडू शकते. अर्थात राष्ट्रपतीपदासाठी आज तरी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती आम्हाला दिसत नाही. आम्ही आमचे मत मोकळेपणाने मांडले आहे व त्यासाठी गुप्त भेटीगाठी घेण्याची गरज नाही सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना खुला पाठिंबा दर्शवला आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले. 
 
मुरली मनोहर जोशी यांनी नागपुरात जाऊन सरसंघचालकांची ‘गुप्त’ भेट घेतली आहे. या गुप्त भेटीचे वैशिष्ट्य असे की, श्री. मुरली मनोहर संघ मुख्यालयात पोहोचण्याआधीच भेटीचे गुपित उघड झाले. या भेटीचा गवगवा झाला. तरीही जोशी व सरसंघचालकांतील भेट ‘गुप्त’च होती हे मान्य करावे लागेल. अशा वाजतगाजत झालेल्या भेटींना कुणी गुप्त वगैरे म्हणत असतील तर तो मोठाच विनोद म्हणावा लागेल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.  
 
मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पण लालकृष्ण आडवाणींप्रमाणे तेदेखील मार्गदर्शक मंडळात गुदमरले आहेत. आडवाणी किंवा जोशींसारखे नेते हे भाजपाचे पुराणपुरुष आहेत. भाजपाच्या वाटचालीत व जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. आता नव्या युगात या मंडळींना विशेष काम नाही हे मान्य केले तरी उद्याच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्यासारख्या ज्येष्ठांना काही महत्त्व उरले आहे काय, याची चाचपणी सुरू आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.  
 
नागपूरचे संघ मुख्यालय आता सत्तेचे दुसरे केंद्र बनले आहे व यावर कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. जामा मशिदीचा इमाम हे महाशय सत्तेचे केंद्र ठरू शकतात, तर मग संघाचे मुख्यालय का असू नये? हा साधा सवाल आहे. अर्थात राष्ट्रपतीपदासाठी आज तरी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती आम्हाला दिसत नाही. आम्ही आमचे मत मोकळेपणाने मांडले आहे व त्यासाठी गुप्त भेटीगाठी घेण्याची गरज नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. 
 
खरी गुप्तता  म्हणजे काय, ती कशी तंतोतंत पाळली जाते, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला इतिहासात मिळू शकतात. छत्रपती शिवरायांनी स्वतःची आग्र्याहून सुटका करून घेतली आणि ते औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुखरूप निसटले तोपर्यंत त्याची कुणकुण तेथील कोणालाही लागली नव्हती. शिवराय सुखरूप परतल्यानंतरच औरंगजेबाला त्याचा पत्ता लागला. ही खरी गुप्तता. नेताजी सुभाषचंद्र बोस हेदेखील ज्या गोपनीय पद्धतीने ब्रिटिशांची ‘नजर’ चुकवून सुखरूप सीमापार गेले त्याला खरी गुप्तता म्हणता येईल. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय जाहीर करेपर्यंत त्याची ‘खबर’ कुणालाही नव्हती. आज चित्र काय आहे? या देशात आता ‘गुप्त’ असे काही उरले आहे काय? ‘नोटाबंदी’चा पहाड कोसळणार हे वृत्त गुजरातच्या वृत्तपत्रांत आधीच प्रसिद्ध झाले होते! गुप्ततेचे संदर्भ आणि व्याख्या यापुढे बदलाव्या लागतील असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.