शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचे विघ्न नकोच

By admin | Updated: August 26, 2014 01:07 IST

‘श्री’चे आगमन होणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे २९ आॅगस्टपर्यंत बुजवा व त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवा, असे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी नागपूर महापालिका,

‘श्री’च्या आगमनापूर्वी खड्डे बुजवा : पालकमंत्र्यांचे आदेशनागपूर : ‘श्री’चे आगमन होणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे २९ आॅगस्टपर्यंत बुजवा व त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवा, असे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. नागपूरमधील रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी महापालिका आयुक्तांना सोबत घेऊन शहरातील विविध भागांना भेटी देऊन खड्ड्यांची पाहणी केली. त्यानंतर दुपारी रविभवनमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीनतंर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खड्डे बुजविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमाची माहिती दिली.शहरात केलेल्या दौऱ्याच्या वेळी अनेक ठिकाणी खड्डे आढळून आले. ठिकठिकाणी मेनहोल्स उघडे पडले होते. खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे तातडीचा प्रश्न म्हणून यासंदर्भात बैठक घेण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.२९ आॅगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार असून ‘श्री’च्या आगमनाचा, विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे प्राथमिकतेने बुजविणे गरजेचे आहे. त्यासाठी तीन टप्प्याचा कार्यक्रम देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे २८ आॅगस्टपर्यंत ‘श्री’चे आगमन ज्या रस्त्यांनी होते ते मार्ग, दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ सप्टेंबरपर्यंत विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे आणि तिसऱ्या टप्प्यापर्यंत म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत उर्वरित शहरातील मार्गावरील खड्डे बुजवण्यास सांगण्यात आले, असे राऊत म्हणाले.शहरात नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा मार्ग आणि इतर असे एकूण ३९६० कि.मी.चे रस्ते आहेत. महापालिकेच्या रस्त्यावर ५००० खड्डे आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर-हैदराबाद महामार्गावर ५५ तर नागपूर-जबलपूर मार्गावर २९ खड्डे आहेत. जुना वळणमार्ग पूर्णपणे उखडला असून, सुधार प्रन्यासच्या रस्त्यावर किती खड्डे आहेत, याची माहिती त्यांच्याकडे नाही. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे तसेच याबाबतची माहिती रोज देण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहे, असे राऊत यांनी सांगितले. या कामासाठी यंत्रणांकडे निधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शहरात विविध यंत्रणांचे रस्ते असले तरी नागरी सुविधा देण्याची जबाबदारी ही महापालिकेची असल्याने त्यांनी याबाबत गंभीर असणे गरजेचे आहे. कधी काळी नागपूर येथील रस्त्यांमुळे ओळखले जात होते. ‘टॉप टेन’ सिटीमध्ये शहराचा समावेश होता. मात्र महापालिकेने त्याची वाट लावली, असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला. वर्ल्डक्लास सिटीचे सादरीकरण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करावे, अशा सूचनाही महापालिकेला देण्यात आल्या. पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व काँग्रेस नेते जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)