शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

अभिमतच्या जागांसाठी ‘नीट’ची तयारी गरजेचीच

By admin | Updated: May 20, 2016 01:16 IST

राज्यातील मेडिकलच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा रद्द करण्याचा अध्यादेश केंद्र शासनाने काढावा,अशी जोरदार मागणी केली

पुणे : राज्यातील मेडिकलच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा रद्द करण्याचा अध्यादेश केंद्र शासनाने काढावा,अशी जोरदार मागणी केली जात आहे. त्यावर शासनाने यासंदर्भात अध्यादेश काढून राज्यातील मेडिकलचे प्रवेश सीईटीच्या आधारे द्यावेत, असे निर्देश दिले; तरीही अभिमत विद्यापीठांमधील मेडिकलच्या जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील विद्याथ्यांना ‘नीट’ परीक्षेची तयारी करावीच लागणार आहे.गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या नीट व सीईटी परीक्षेच्या गोंधळामुळे राज्यातील शासकीय मेडिकल कॉलेज, खासगी महाविद्यालये व अभिमत विद्यापीठामधील मेडिकल प्रवेशाच्या जागा कशा भरल्या जातील याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे. केवळ शासकीय महाविद्यालयातील जागाच सीईटीतून भरल्या जातील, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. तसेच अभिमत विद्यापीठांकडून न्यायालयात बाजू मांडण्याबाबत फारशा हालचाली केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. अभिमत विद्यापीठामधील प्रवेश नीट परीक्षेच्या माध्यमातून होणार आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक प्रविण शिनगारे म्हणाले, राज्यातील शासकीय मेडिकल कॉलेज व खासगी मेडिकल कॉलेजमधील जागा शासनाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे नीट परीक्षा रद्द करण्याचा अध्यादेश काढल्यास या जागा सीईटी परीक्षेतून भरल्या जातील. परंतु, अभिमत विद्यापीठाच्या जागांवरील प्रवेश नीट परीक्षेच्या माध्यमातूनच भरल्या जाणार आहेत. राज्यात शासकीय मेडिकल कॉलेजच्या एकूण जागा २ हजार ८०० तर खासगी मेडिकलच्या जागा १ हजार ६०० आहेत. तसेच अभिमत विद्यापीठाच्या जागा १ हजार ७०० आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत.