शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यातून कर्जवसुली नाही

By admin | Updated: March 31, 2017 04:50 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या रकमेतून कर्जाची ५० टक्के वसुली करण्याच्या

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या रकमेतून कर्जाची ५० टक्के वसुली करण्याच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका सुरू होताच अखेर तो वादग्रस्त निर्णय फडणवीस सरकारने मागे घेतला. तशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना भरपाईची विम्याची रक्कम पूर्ण मिळेल.कर्जमाफीच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांकडील कर्जवसुली थांबली आहे. त्यामुळे थकीत असलेल्या कर्जाची वसुली ही पीक विम्याच्या ५० टक्के रकमेतून केली जावी, असे आदेश शासनाने जारी केले. त्यानुसार सहकारी व अन्य बँकांनी पीक विम्यातून वसुली सुरू केली होती.राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०१५-१६ मधील नुकसानभरपाईस पात्र ठरलेल्या २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८९३.८३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. भारतीय कृषी विमा कंपनीकडून नुकसानभरपाईची रक्कम संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातूनच कर्जाची रक्कम वसुली सुरू होती. ही बाब उघड झाल्याने सरकारच्या धोरणावर चहूबाजूंनी टीका सुरू झाली. विरोधी पक्षाच्या हाती तर आयतेच कोलीत मिळाले. (विशेष प्रतिनिधी)संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून निर्णय मागेपीक विम्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे. आधीच्या सरकारमध्ये १०० टक्के पीक विमा कर्जाच्या रकमेत वर्ग केला जात होता. मात्र, आमच्या सरकारने केवळ ५० टक्के रक्कम कर्ज खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावरही विरोधकांनी राजकारण सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून निर्णय मागे घेत आहोत. - सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री कर्जकपात नुकसानकारक ठरत असल्याने माघारकर्जमाफीसाठी विरोधी पक्षाची संघर्ष यात्रा सुरू झाली असतानाच पीक विम्यातून कर्जकपातीचा विषय उघड झाल्याने विरोधी पक्ष सरकारविरोधात आणखी आक्रमक झाला. कर्जकपातीचा हा आदेश नुकसानकारक ठरत असल्याचे पाहून अखेर युती सरकारने एक पाऊल मागे घेत आपला निर्णय फिरविला. पीक विम्यातून कर्जकपात करू नये, असे आदेश जारी करण्यात आले. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी दीपक राणे यांनी त्यासंबंधी पत्र सहकार आयुक्तांना व त्यांच्याकडून सर्व जिल्हा बँकांना पाठविले.