शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःला कृष्णाची उपमा दिल्यानं कोणी कृष्ण होत नाही- उद्धव ठाकरे

By admin | Updated: January 29, 2017 17:27 IST

स्वतःला कृष्णाची उपमा दिल्यानं कोणी कृष्ण होत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर पलटवार केला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - स्वतःला कृष्णाची उपमा दिल्यानं कोणी कृष्ण होत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर पलटवार केला आहे. भाजपाच्या काल झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेची तुलना कौरवांशी, तर उद्धव यांची तुलना दुर्योधनाशी केली होती. तसेच भाजपाला पांडव म्हटलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि आशिष शेलारांवर टीकेची तोफ डागली आहे. मी जास्त बोललो तर माझा घसा बसेल, असा उपरोधिक टोला त्यांनी भाजपाला हाणला आहे. मुख्यमंत्र्यांची स्वच्छ प्रतिमा आता मलिन झाली आहे. ते आता गुंडांचे मंत्री तर नाहीत ना, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. लाल किल्ल्यावर भाषण केल्यानं कोणी पंतप्रधान होत नाही, तर स्वतःला पांडव म्हटल्यानं कोणी पांडवही होत नाही, असं उद्धव ठाकरेंनी आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाला जी काही टीका करायची आहे ती करू द्या, त्याकडे लक्ष न देता आपण केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे. (भाजपा पांडव, शिवसेना कौरव - आशिष शेलारांचे टीकास्त्र)आम्ही मुंबईला घडवल्याशिवाय शांत बसणार नाही. मुंबई-ठाणेकरांना दिलेली आश्वासनं नक्की पूर्ण करणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. माझ्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आणि अच्छे दिनबद्दल आता कोणीच का बोलत नाही, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला आहे. सगळ्यांचे मुखवटे आता उतरले आहेत आणि त्यांचे खरे चेहरे लोकांसमोर आले आहेत, असंही ते भाजपाला उद्देशून म्हणाले आहेत.