शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

युतीतील वादाचं काय होईल माहिती नाही

By admin | Updated: July 1, 2016 09:57 IST

भविष्यातील वाटचाल दोन्ही पक्षांवर अवलंबून असेल, असे सांगत आम्हाला ज्या धोरणात्मक गोष्टी पटणार नाहीत, त्यावर आम्ही बोलतच राहू

मुंबई : युतीतील वाद मिटेल की नाही, हे मला माहिती नाही. भविष्यातील वाटचाल दोन्ही पक्षांवर अवलंबून असेल, असे सांगत आम्हाला ज्या धोरणात्मक गोष्टी पटणार नाहीत, त्यावर आम्ही बोलतच राहू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून १ ते ७ जुलैदरम्यान राज्यभर वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात वनदिनाच्या निमित्ताने १ जुलै रोजी २ कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी आज थेट मातोश्री गाठले. हे निमंत्रण स्वीकारत कार्यक्रमाला हजर राहण्याचे आश्वासन उद्धव यांनी दिले. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये १५-२० मिनिटे चर्चा झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर, उद्धव यांनी युतीतील वाद मिटेल की नाही हे मला माहिती नाही. भविष्यातील वाटचाल दोन्ही पक्षांवर अवलंबून असेल, असे स्पष्ट केले. आजची भेट राजकीय नव्हती. आम्ही केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे सांगत उद्धव यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. आम्ही कार्यकर्त्यांना संयम बाळगण्यास सांगितले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. (प्रतिनिधी)>महाजनांच्या भूमिकेत सुधीरभाऊपूर्वी युतीत तणावाचे प्रसंग निर्माण होत तेव्हा दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यातून मार्ग काढत. महाजनांनंतर काही काळ गोपीनाथ मुंडे यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यांच्यानंतर मात्र भाजपाच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने अशी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, मातोश्री भेटीचा प्रकार थांबविण्याचेच धोरण पक्षाने स्वीकारले होते. मात्र, गुरुवारी मुनगंटीवारांनी ‘मातोश्री’ला भेट देत महाजनांची परंपरा सुरू ठेवली.>उद्धव यांना वाघ भेटवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी उद्धव यांना फायबरच्या पूर्णाकृती वाघाचे शिल्प भेट दिले. याबाबत छेडले असता, राज्यातच नाही, तर देशातही वाघ वाढवायला हवेत, यावर आमचे एकमत झाले आहे, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. >१० जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्तारया भेटीत काही राजकीय विषयांवरही चर्चा झाली. युतीतील वादावर पडदा टाकत नव्याने वाटचाल करण्याबाबत आमचे एकमत झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, शिवसेनादेखील या विस्तारात सहभागी होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री १० ते १६ जुलैदरम्यान रशियाचा दौरा करणार आहेत.