शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ नाही

By admin | Updated: June 9, 2016 05:52 IST

महाविद्यालयातील प्रवेश जेईई या एकाच परीक्षेच्या माध्यमातून करण्याचा आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनचा (एआयसीटीई) विचार नाही

पुणे : देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश जेईई या एकाच परीक्षेच्या माध्यमातून करण्याचा आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनचा (एआयसीटीई) विचार नाही, असे एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे यांनी बुधवारी लोकमत’ला सांगितले. देशातील मेडिकलचे प्रवेश केवळ नीट परीक्षेच्या आधारेच दिले जातील, असा निर्णय झाल्याने महाराष्ट्रासह आणखी काही राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत अभ्यास करून नीट परीक्षा देणे शक्य नव्हते. त्यामुळे केंद्र शासनाला याबाबत अध्यादेश काढावा लागला होता. त्यातच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेशही केवळ जेईई परीक्षेच्या आधारेच घेतले जातील, अशी माहिती समोर आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश जेईईच्या आधारे करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. एआयसीटीईकडून पायाभूत सुविधा नसलेल्या आणि विद्यार्थी संख्या कमी असणा-या महाविद्यालयांची तपासणी केली जात आहे. काही संस्थाचालक स्वत:हून महाविद्यालये बंद करण्याचे प्रस्ताव सादर करत आहेत. (प्रतिनिधी)>सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘देशातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश जेईई परीक्षेच्या आधारे करणे सध्या शक्य नाही. त्याबाबत एआयसीटीईने कोणताही विचार केलेला नाही. एखादी परीक्षा घेवून त्यानुसारच प्रवेश केले जातील,असे अचानक सांगून चालत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा कालावधी दिला पाहिजे. ’’