शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तूर्तास भारनियमन नाही

By admin | Updated: April 21, 2016 04:58 IST

भीषण पाणीटंचाईमुळे जलविद्युत प्रकल्पांबाबत प्रश्नचिन्ह असले तरी औष्णिक प्रकल्पातून पुरेशी वीजनिर्मिती होत असल्याने राज्याला भारनियमनाच्या संकटातून तूर्तास दिलासा मिळाला आहे.

मेहरून नाकाडे, रत्नागिरीभीषण पाणीटंचाईमुळे जलविद्युत प्रकल्पांबाबत प्रश्नचिन्ह असले तरी औष्णिक प्रकल्पातून पुरेशी वीजनिर्मिती होत असल्याने राज्याला भारनियमनाच्या संकटातून तूर्तास दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढला असून राज्याला दिवसाला सरासरी १७ हजार ४६४ मेगावॅट वीज लागते. केंद्रीय प्रकल्प, खासगी, महाजनकोच्या प्रकल्पातून दिवसाला सरासरी १९ हजार ०६३ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. मेमध्ये मागणी वाढली तरी पुरवठा करण्यास महावितरणला कोणतीही अडचण भासणार नाही.कोयना वीजप्रकल्पात एक हजार ९६० मेगावॅट वीजनिर्मिती होते. सध्या कोयना धरणात २४ टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. त्यापैकी १५ टीएमसी पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा, अशा सूचना ऊर्जा विभागाने केल्या आहेत. वीजनिर्मितीसाठी ९ टीएमसी पाणी शिल्लक असून, ३१ मे पर्यंत पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या कोयनेच्या प्रकल्प १ व २ मधून ४० मेगावॅट, प्रकल्प ३ मधून १५७ मेगावॅट तर प्रकल्प ४ मधून ५९३ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. भविष्यात ही वीजनिर्मिती कमी प्रमाणात होणार आहे. कोयनेखेरीज परळीचा जलविद्युत प्रकल्प जुलैखेरीज बंदच आहे. जलविद्युत प्रकल्पांची क्षमता कमी असली तरी औष्णिक प्रकल्पांनी मात्र महाराष्ट्रातील जनतेला तारले आहे. मुंबई शहरातील बांद्रा ते दहिसरपर्यंत ‘रिलायन्स’ कंपनीकडून तर कुलाबा ते बांद्रापर्यंत ‘बेस्ट’ अशा दोन खासगी कंपनीकडून वीजपुरवठा करण्यात येत आहे. मुंबईला दोन ते अडीच हजार मेगावॅट लागणारी वीज खासगी कंपनीकडून पुरविण्यात येते. कांजूरमार्ग व दहिसरपासून पुढे उर्वरित संपूर्ण राज्यात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. मुंबईव्यतिरिक्त राज्यातून १७,४६३ मेगावॅट विजेची मागणी करण्यात येत असली तरी औष्णिक प्रकल्पांमुळे महावितरणपुढे सध्या तरी कोणतीही अडचण नाही. केंद्रीय वीज प्रकल्पातून ६,३६३ मेगावॅट, खासगी कंपन्यांकडून ५,५०० मेगावॅट, महाजनकोतर्फे ७,२०० मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. दररोज एकूण १९,०६३ मेगावॅट विजेचा पुरवठा राज्याला होत आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करूनही १,५०० मेगावॅट वीज शिल्लक राहत आहे.चंद्रपूर येथील २१० मेगावॅट वीजनिर्मितीचे दोन संच आयुर्मान संपल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. परंतु ५०० मेगावॅट वीजनिर्मिती करणारे दोन संच मात्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथून वीजपुरवठा सुरू आहे. कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती बंद होण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्याकरिता अल्पकालीन वीज खरेदीची तरतूद केली आहे. परंतु औष्णिक प्रकल्पातून पुरेसा वीजपुरवठा होत असल्यामुळे वीज खरेदीची गरज भासणार नाही.- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, प्रकाशगड, मुंबई.