शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

फोडाफोडी करून दिल्लीत सरकार नको

By admin | Updated: July 20, 2014 01:47 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजपाला दिल्यामुळे दिल्लीतील सत्ता स्थापनेला नागपुरातून ब्रेक लागल्याचे समजते.

मुंबई : काँग्रेसचे वा इतर कुठल्याही पक्षाचे आमदार फोडून भाजपाने दिल्लीत सरकार स्थापन करू नये, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजपाला दिल्यामुळे दिल्लीतील सत्ता स्थापनेला नागपुरातून ब्रेक लागल्याचे समजते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी नागपुरात सरसंघचालक डॉ.भागवत यांची भेट घेतली, तेव्हा हा सल्ला देण्यात आल्याचे सूत्रंनी सांगितले. दिल्लीत काँग्रेसचे सहा आमदार फोडण्यासाठी भाजपाने प्रत्येकी सहा कोटी रुपयांची ऑफर दिली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नुकताच केला आहे. सूत्रंनी सांगितले की, घोडेबाजाराच्या आरोपापासून वाचण्याचा सल्ला सरसंघचालकांनी शहा यांना दिला. दिल्लीत बहुमताअभावी कुणाचेही सरकार स्थापन करणो शक्य नाही. त्यामुळे तेथे महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणासोबत निवडणूक घ्यावी, असेही त्यांनी सुचविल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा यशाचा फायदा तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला होणार आहे. दिल्लीत निवडणूक घेतली तर तसाच फायदा होईल. आम आदमी पार्टीबाबत दिल्लीकरांचा भ्रमनिरास झाला आहे, असे मतही डॉ.भागवत यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. दिल्लीत काँग्रेसचे सहा आमदार फोडण्याची पूर्ण तयारी भाजपाने केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौ:याहून परतल्यानंतर त्यांच्या संमतीने राज्य सरकार स्थापण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे आधी म्हटले जात होते. मोदी परदेशातून परतल्याला तीन दिवस उलटले तरी सरकार स्थापण्याच्या हालचाली दिसत नाहीत. याला मुख्य कारण तोडफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापण्यास रा.स्व.संघाने केलेला विरोध असल्याचे म्हटले जात आहे.