शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचीही अद्याप नाही सुविधा

By admin | Updated: March 4, 2017 00:56 IST

गावची लोकसंख्या जवळपास दहा हजारच्या जवळपास असून या गावासाठी महापालिकेची बससेवा अद्याप सुरू नाही.

आंबेगाव बुद्रुक : आंबेगाव खुर्द हे गाव पुणे शहरालगत असल्याने या गावची लोकसंख्या जवळपास दहा हजारच्या जवळपास असून या गावासाठी महापालिकेची बससेवा अद्याप सुरू नाही. येथील नागरिकांना व शाळेच्या विद्यार्थिनींना जवळपास दीड किलोमीटर चालत दत्तनगरमध्ये बससाठी पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वयोवृद्ध नागरिकांना आंबेगावातून रिक्षाची सोय नसल्याने चालत जाणे त्रासाचे झाले आहे.आंबेगाव खुर्द गावठाणापर्यंत बस चालू करण्यासाठी पुणे महानगर परिवहन विभागाला सर्व कागदपत्रांची पूर्तता आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतीने केली असल्याचे आंबेगाव ग्रामपंचायतसदस्य प्रसाद जगताप यांनी सांगितले. प्रशासनाने त्याच्यावर कोणतीही कारवाई किंवा दखल घेतली नसल्याचे जगताप यांनी सांगितले.एकीकडे शहरातील पीएमपी सेवेविषयी प्रवाशांच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यासंबंधी प्रशासन गंभीर नाही. निकृष्ट दर्जाची सेवा मिळत असल्याची तक्रार सर्वत्र होताना दिसते. येथे तर सेवाच मिळत नाही. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीकडे कोण लक्ष देणार, हा प्रश्नच आहे. प्रवाशांच्या हाकेकडे पीएमपी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.आंबेगाव येथे नुकतेच स्वामी नारायण मंदिर झाले असून भाविकाची गर्दी वाढत आहे व जवळ जांभूळवाडी तलावात नौकाविहारासाठी पर्यटक येत असल्याने लवकरात लवकर बस चालू करण्याची मागणी आंबेगाव खुर्दच्या नागरिकांनी केली आहे.