शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांसाठी सुविधा नाहीच

By admin | Updated: March 25, 2016 02:49 IST

वारंवार आदेश देऊनही अपंगांसाठी तिकीट खिडकी, पाणपोई, रॅम्प अशा सुविधा उपलब्ध करण्यास पश्चिम व मध्य रेल्वे दिरंगाई करीत असल्याने उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला चांगलेच

मुंबई : वारंवार आदेश देऊनही अपंगांसाठी तिकीट खिडकी, पाणपोई, रॅम्प अशा सुविधा उपलब्ध करण्यास पश्चिम व मध्य रेल्वे दिरंगाई करीत असल्याने उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. आदेशांचे पालन करून घेण्यासाठी पश्चिम व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांवर अवमान कारवाई करण्याचे संकेत उच्च न्यायालयाने दिले. रेल्वे प्लॅटफॉर्मवर अपंगांसाठी रॅम्प, पाणपोईमध्ये कमी उंचीचे नळ तसेच कमी उंचीची तिकीट खिडकी व अन्य सुविधा उपलब्ध करण्याचा आदेश दोन-तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र अद्यापही या आदेशांचे पालन करण्यात आले नाही. इंडिया सेंटर फॉर ह्युमन राईट्स या एनजीओने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात आले की नाही, हे पाहण्यासाठी तिन्ही मार्गांवरील स्टेशनांची पाहणी केली. मात्र या पाहणीतून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे स्पष्ट झाले. ह्युमन राईट्सतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंग यांनी पश्चिम, मध्य व हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील ३१ प्लॅटफॉर्मची पाहणी केल्याचे न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाला सांगितले. ‘पश्चिम रेल्वेच्या १२ प्लॅटफॉर्मची, मध्यच्या १० व हार्बरच्या ९ प्लॅटफॉर्मची पाहणी केली. काही ठिकाणी अपंगांसाठी तिकीट खिडक्या नाहीत, तर काही प्लॅटफॉर्मवर कमी उंचीचे नळ नाहीत,’ असे अ‍ॅड. सिंग यांनी खंडपीठाला सांगितले. ‘प्लॅटफॉर्मवरती अपंगांसाठी सुविधा उपलब्ध करा, असे आदेश २०१३पासून वारंवार देण्यात येत आहेत. तरीही त्याची अंमलबजावणी केलेली नाही. आता याची अंमलबजावणी कशी करून घ्यायची हे आम्हाला माहीत आहे. यासाठी आम्हाला पश्चिम व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांवर अवमान कारवाई करावी लागेल,’ असे खंडपीठाने स्पष्ट संकेत दिले. या आदेशाचे पालन करण्यास कोणते अधिकारी जबाबदार आहेत? अशी विचारणा करीत खंडपीठाने रेल्वेचे वकील सुरेश कुमार यांना संबंधित अधिकाऱ्यांची नावे त्यांच्या पदासह २८ मार्चपर्यंत न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)सिडकोने झटकली जबाबदारीनवी मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मची जबाबदारी सिडकोने रेल्वे प्रशासनावर टाकली. सिडकोने सर्व स्टेशनांचा कारभार रेल्वे प्रशासनाच्या स्वाधीन केला आहे, असे सिडकोने गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाला सांगितले होते. मात्र याबाबत रेल्वेने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यावरही खंडपीठाने संताप व्यक्त केला. ‘मध्य रेल्वेने आता हे थांबवावे. (जबाबदारी झटकण्याचे काम) अपंगांसाठी सिडकोने रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुविधा उपलब्ध केल्या तर त्याचा खर्च रेल्वे प्रशासनाने द्यावा किंवा त्याउलट झाल्यास सिडको रेल्वेला खर्च देईल,’ असे म्हणत मध्य रेल्वेला २८ मार्चपर्यंत नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशनबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.