शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक निविदांसाठी मुदतवाढ नाही

By admin | Updated: January 4, 2017 01:14 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामासाठी पात्र ठरलेल्या चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या आर्थिक निविदा सादर करण्यासाठी दिलेली मुदत ९ जानेवारी

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबईनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामासाठी पात्र ठरलेल्या चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या आर्थिक निविदा सादर करण्यासाठी दिलेली मुदत ९ जानेवारी, २0१७ रोजी संपत आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आणखी मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, आणखी मुदतवाढ न देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विशेष म्हणजे, या कंपन्यांना यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सिडकोने ५ फेब्रुवारी, २0१४ रोजी जागतिक निविदा काढल्या होत्या. त्याला एकूण चार कंपन्यांनी प्रतिसाद देत, विनंती पात्रता प्रस्ताव (आरएफक्यू) सिडकोला सादर केले होते. यात जीएमआर, जीव्हीके, टाटा रियालिटी-एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर आणि झ्युरीच एअरपोर्ट-हिरानंदानी ग्रुप या चार कंपन्यांचा समावेश होता. यापैकी जीएमआर आणि जीव्हीके या कंपन्यांनी अनुक्रमे हैदराबाद, दिल्ली, तसेच मुंबई व बंगळुरू या विमानतळांची उभारणी केली आहे. सिडकोच्या प्रक्रियेत या चारही कंपन्यांचे प्रस्ताव पात्र ठरले होते; परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाने झ्युरीच एअरपोर्ट -हिरानंदानी ग्रुप या भागीदारी कंपनीची निविदा सुरक्षेच्या मुद्द्यावरून बाद ठरविली होती. त्यामुळे स्पर्धेत केवळ तीनच कंपन्या उरल्या होत्या. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या तीन कंपन्यांना अंतिम आर्थिक निविदा सादर करण्यास ७ नोव्हेंबर, २0१६ पर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु ही मुदत संपण्यापूर्वीच स्पर्धेतून बाद ठरलेल्या हिरानंदानी ग्रुपनेही आपली पात्रता सिद्ध करीत, तीन महिन्यांपूर्वी अंतिम निविदा प्रक्रियेत प्रवेश मिळविला. विमानतळ प्रकल्प उभारणीसाठी पात्रतापूर्व व तांत्रिक निविदा प्रक्रियेतून आर्थिक निविदा (आरएफपी) सादर करण्यासाठी पात्र ठरलेल्या कंपन्यांना यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. नियोजित वेळेत प्रकल्प उभारण्यासाठी मुदतवाढ न देण्याची सिडकोची भूमिका आहे. - भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको