शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या भुईमुगाशी देणंघेणं नाही - उद्धव

By admin | Updated: November 26, 2014 01:53 IST

खडसेंचे भुईमूग वर येतात की, खाली ते मला माहित नाही. त्यांच्या भुईमुगाशी मला काही देणंघेणं नाही. मला शेतक:यांचे प्रश्न महत्वाचे आहेत,

औरंगाबाद : खडसेंचे भुईमूग वर येतात की, खाली ते मला माहित नाही. त्यांच्या भुईमुगाशी मला काही देणंघेणं नाही. मला शेतक:यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या टिकेला मंगळवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
 गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना आमदारांसमवेत उद्धव मराठवाडा दौ:यावर आहेत. वीजबिलासंदर्भात खडसे यांनी केलेल्या विधानावर त्यांनी काल टीका केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देताना  खडसेंनी आज उद्धव ठाकरे यांना भुईमुगातील काही कळते का, असा सवाल केला होता. त्यावर उद्धव म्हणाले, 
 खडसे काल  अजित पवारांची भाषा बोलले आणि आज शरद पवारांची!    पवारांनी एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रताळे कुठे उगवतात हे माहिती आहे का, असा सवाल केला होता. त्यावर बाळासाहेबांनी त्यांना ठाकरेशैलीत उत्तर दिले होते. पण मी खडसेंना इथे तशा भाषेत उत्तर देऊ इच्छित नाही.  
 खडसे हे उपग्रहाच्या मदतीने दुष्काळाची माहिती घेत आहेत. उपग्रहाच्या आधारेच दुष्काळाची माहिती घ्यायची असेल, तर मंत्रिमंडळ कशाला हवे, असा सवालही ठाकरे यांनी केला. (प्रतिनिधी)  
 
सध्यातरी स्वप्नरंजन नाही
शिवसेना सध्यातरी सत्तेत सहभागी होण्याच्या स्वप्नरंजनात नाही. उद्या काय होईल, ते आज सांगणो अवघड आहे. आजघडीला विरोधी बाकावर बसण्याची पक्षाची भूमिका असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर भाजपाचे सरकार अल्पमतात असल्याचे विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे म्हणाले.