शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

समीरविरोधात ठोस पुरावेच नाहीत

By admin | Updated: November 20, 2015 01:18 IST

ज्येष्ठ विवेकवादी नेते कॉ. गोविंद पानसरे (८२) यांच्या हत्येत समीर गायकवाडचा (३२) सहभाग आहे की नाही याची चौकशी पूर्ण झाली असून, त्यातून ठोस काहीही हाती लागले नसल्याचे

- डिप्पी वांकाणी,  मुंबईज्येष्ठ विवेकवादी नेते कॉ. गोविंद पानसरे (८२) यांच्या हत्येत समीर गायकवाडचा (३२) सहभाग आहे की नाही याची चौकशी पूर्ण झाली असून, त्यातून ठोस काहीही हाती लागले नसल्याचे शपथपत्र लवकरच दाखल केले जाणार असल्याचे संकेत राज्याच्या पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले. समीर गायकवाडचा पानसरेंच्या हत्येत सहभाग असल्याचा कोणताही पुरावा आम्हाला अद्याप मिळवता आलेला नाही, असे या सूत्रांनी सांगितले. विशेष तपासणी पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांनी मात्र आम्ही अद्याप निर्णयाप्रत आलेलो नाही, असे ‘लोकमत’ ला सांगितले. ‘‘पानसरेंच्या हत्येत समीर गायकवाडचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा अद्याप हाती लागलेला नाही व ही बाब नमूद करणारे शपथपत्र न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता आहे,’’ असे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शपथपत्र दाखल झाले की समीर गायकवाड त्याच्या आधारावर जामीन मिळण्यासाठी अर्ज करू शकतो. मात्र याचा अर्थ गायकवाडला पोलीस निर्दोष समजतात (क्लीन चिट) असा होत नाही. तथापि, आज त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे कोणताही पुरावा नाही, असा त्याचा अर्थ आहे.पानसरेंच्या हत्येनंतर पोलिसांनी कोटींपेक्षा जास्त फोन कॉल्सची छाननी केली आणि गायकवाडवर तो त्याची मैत्रीण ज्योती कांबळे हिच्याशी पानसरेंच्या हत्येबद्दल बोलत असल्यासंदर्भात आणि मडगाव येथील स्फोटातील आरोपी रुद्र पाटीलच्या संपर्कात असल्याबद्दल नजर ठेवली होती. पाटील सध्या फरार आहे. पानसरेंना कसे संपविले आणि त्यांच्याबद्दल त्याच्या मनात कसा द्वेष आहे याच्या मोठमोठ्या गप्पा गायकवाडने ज्योती कांबळेशी बोलताना कशा मारल्या होत्या याची माहिती यापूर्वी पोलिसांनी दिली होती. गायकवाडच्या घरातून २३ मोबाइल हँडसेटस् व ३१ सिमकार्डस् जप्त केले होते. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ समीरवर लक्ष ठेवल्यानंतर पोलिसांनी त्याला १६ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली असताना त्याचा रेकॉर्ड केलेला आवाज आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले असताना घेतलेला आवाजाचा नमुना यांचे विश्लेषण करण्यासाठी पोलिसांनी गुजरात पोलिसांकडे मदत मागितली होती.दोघांविरुद्ध पुरावे नाहीतमहाराष्ट्र पोलिसांनी मनीष नागोरी (२४) आणि विलास खंडेलवाल (२२) यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी अटक केली होती. या दोघांच्या विरोधात पुरावा नसल्याचे शपथपत्र याआधी पोलिसांनी दाखल केले होते.एसआयटीने यासंदर्भात काहीही सांगण्यास नकार दिला. ‘‘चौकशी सुरू आहे. गायकवाडच्या अटकेला ९० दिवस पूर्ण व्हायच्या आधी त्याच्यावर आरोपपत्र दाखल करायचे की नाही यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करू,’’ असे कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजीव वर्मा यांनी सांगितले. १६ फेब्रुवारीला पानसरे व त्यांची पत्नी उमा यांच्यावर कोल्हापूरमध्ये दोघांनी गोळ्या झाडल्या होत्या. चार दिवसांनी पानसरेंचा मृत्यू झाला.