शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

गिरगाव आगीबाबत अद्याप गुन्हा दाखल नाही

By admin | Updated: February 26, 2016 04:14 IST

‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी सादर केलेल्या अहवालात, आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल

मुंबई : ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी सादर केलेल्या अहवालात, आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आल्याने डी.बी. मार्ग पोलीस आता सक्रिय झाले आहेत. अग्निशमन दलाच्या अहवालानुसार, संबंधित कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, अद्याप या प्रकरणी कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गिरगाव चौपाटी येथे आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात सदोष वायरिंगमुळे आग लागली. त्यात १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली असल्याने ही आग वेगाने पसरल्याचे अग्निशमन दलाने पालिकेला सादर केलेल्या आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. या प्रकरणी आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आले आहे. हा अहवाल पालिकेकडून पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर भादंवि २८५ कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई होण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली आहे. मात्र, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याने अद्याप कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे डी.बी. मार्ग पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)सरकारही जबाबदार असल्याचा विरोधकांचा आरोपया भीषण आगीसाठी अग्निशमन दलाने आयोजकांवर ठपका ठेवला आहे़ मात्र, आयोजकच नव्हे, तर राज्य सरकारही जबाबदार असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षांकडून होत आहे़या आगीच्या घटनेचा चौकशी अहवाल अग्निशमन दलाने बुधवारी पालिका आयुक्त अजय मेहता यांना सादर केला़ कार्यक्रमाच्या स्थळी असलेली सदोष विद्युत यंत्रणा व उपकरणे, तसेच स्टेजखालील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका उडाला़ धोक्याची पूर्वसूचना आयोजकांना देऊनही, त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे़अग्निशमन दल सरकारच्या विरोधात जाऊ शकत नाही, हे माहीत होते, म्हणूनच स्वतंत्र चौकशीची मागणी करत होतो, असे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले़, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे़