शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीकडे भरपाईसाठी दावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 06:34 IST

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्या.

मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्या. या घटनेत एसटीतील १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी मृतांच्या नातेवाईकांनी एसटी महामंडळाकडे भरपाईसाठी दावा केलेला नाही. त्यामुळे मदत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळच त्यांच्या नातेवाईकांकडे जाणार आहे. रत्नागिरी आगाराची जयगड-मुंबई व राजापूर आगाराची राजापूर-बोरीवली बस रात्री ११.३५ च्या सुमारास महाडजवळच्या ब्रिटिशकालीन पुलावरून जात होत्या. हा पूल कोसळताच पुरात त्या बस वाहून गेल्या. जयगड-मुंबई बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक एन. एन. कांबळे, वाहक व्ही. के. देसाई यांच्यासह ९ प्रवासी होते. तर राजापूर -बोरीवली बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक जी. एस. मुंडे व वाहक पी. बी. शिर्के यांच्यासह नऊ प्रवासी होते. असे एकूण २२ प्रवासी वाहून गेल्याची नोंद एसटी महामंडळाकडे आहे. या घटनेनंतर दहा लाख रुपयांचा विमा व चार लाख रुपयांची नुकसान भरपाई अशी १४ लाख रुपयांची मदत एसटी महामंडळाने मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली. मदत जाहीर होताच स्थानिक प्रशासनाकडून मृतांचा आकडा हा २९ आणि त्यानंतर ३१ असल्याचे सांगितले गेले. मात्र बसमधील वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स तिकिटांच्या मशिनमधील नोंदीनुसार चालक वाहक सोडता १८ प्रवासी असल्याची अधिकृत नोंद आहे. तर घटनेपूर्वी बस घाटातून जात असल्याने ट्रायमॅक्सच्या मशिनला रेंज नव्हती. त्यामुळे उर्वरीत प्रवाशांची नोंद झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांनी अद्यापही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी एसटी महामंडळाकडे संपर्क साधलेला नाही. घटनेची भीषणता व संवेदनशीलता लक्षात घेऊन महामंडळाकडे नोंद असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांची भेट घेतली जाईल आणि शहानिशा केला जाणार आहे.