शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२०१३ पूर्वीच्या बांधकामावर शुल्क नाही

By admin | Updated: January 7, 2015 01:03 IST

नासुप्रच्या आॅगस्ट २०१४ च्या प्रस्तावानुसार मनपाच्या नगररचना विभागाने शहरात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागात ८३.०५ प्रति चौ.फूट शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

नागरिकांना दिलासा : १८ कोटींच्या कामांना मंजुरीनागपूर : नासुप्रच्या आॅगस्ट २०१४ च्या प्रस्तावानुसार मनपाच्या नगररचना विभागाने शहरात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागात ८३.०५ प्रति चौ.फूट शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु या भागातील नागरिकांचा विरोध लक्षात घेता, १४ मे २०१३ पूर्वी केलेले बांधकाम वा भूखंडावर विकास शुल्क न आकारण्याचा निर्णय मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी दिली.१४ मे २०१३ नंतरच्या बांधकामावर प्रति चौ.फूट ५५ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून या भागातील विकास कामे केली जाणार आहेत. बैठकीत शहरातील १८ कोटींच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. हुडकेश्वर-नरसाळा भागातील रस्ते, गडर लाईन व पथदिवे यासाठी पाच कोटींच्या कामांचा समावेश आहे. दिघोरी येथील विनोबाग्राम गृहनिर्माण सहकारी संस्था परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या ७१.८० लाखांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. सीए रोड ते शास्त्रीनगर-हिवरी चौक मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या ३८.८९ लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. ६४, ४५, प्रभाग १०, १ कोटी ६६ लाख, नारा घाट नाल्यावरील पुलाच्या कामाची १.६६ लाखांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. मानकापूर येथील ज्ञानेश्वर सोसायटी, वाठोडा प्रभागातील श्रीकृष्णनगर, पेन्शननगर, बोरगाव चौक ते शारदामाता चौक व पटेलनगर मार्गाचे डांबरीकरण, भांडेप्लॉट भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील इतर भागातील रस्ते व डांबरीकरणाच्या कामांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.(प्रतिनिधी)विकासासाठी मनपाचा निधी नाहीहुडके श्वर-नरसाळा येथील १४ मे २०१३ पूर्वीच्या बांधकामांना विकास शुल्कातून वगळण्यात आले आहे. परंतु या भागात मनपाच्या निधीतून विकास कामे होणार नाही. शासनाकडून प्राप्त निधीतूनच ती केली जातील, असा निर्णय समितीने घेतला आहे. त्यामुळे या भागातील विकास कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (सविस्तर पान ६)१२ कोटींच्या फाईल्स निकालीमावळते आयुक्त श्याम वर्धने यांनी जाता जाता १२ कोटींच्या विकास कामाच्या फाईल्स मंजूर केल्या आहेत. यामुळे शहरातील रस्ते, डांबरीकरण व अन्य कामे मार्गी लागणार असल्याची माहिती बोरकर यांनी दिली.