शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राज्यात एकही बायोगॅस प्रशिक्षण केंद्र नाही

By admin | Updated: October 9, 2015 02:37 IST

अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावागावात बायोगॅस प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली आहे; मात्र केंद्र शासनाचे १०० टक्के अनुदान उपलब्ध असतानाही

- सुनील काकडे,  वाशिमअपारंपरिक ऊर्जास्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावागावात बायोगॅस प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली आहे; मात्र केंद्र शासनाचे १०० टक्के अनुदान उपलब्ध असतानाही अद्ययावत प्रशिक्षण देणारे एकही ‘बायोगॅस डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंन्टर’ राज्यात अद्याप उभे होऊ शकले नाही. त्यामुळे कौटुंबिक बायोगॅस संयंत्र बंद राहण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.‘राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन’ या शंभर टक्के केंद्रपुरस्कृत योजनेची आखणी करण्यात आली. केंद्रशासनाच्या २० कलमी कार्यक्रमात प्रामुख्याने समाविष्ट असलेल्या या योजनेअंतर्गत कौटुंबिक बायोगॅस संयंत्र बसविण्यासाठी सर्वसाधारण गटातील प्रतिलाभार्थी ९ हजार; तर अनुसूचित जाती, जमाती घटकातील लाभार्थीस ११ हजार रुपये अनुदान दिले जाते. शौचालयाला जोडलेल्या संयंत्रास १२०० रुपये अतिरिक्त अनुदान देण्याची तरतूद आहे. याशिवाय लाभार्थी प्रशिक्षण ३ हजार रुपये, स्टाफ कोर्स १० हजार, बांधकाम व देखभाल कोर्स ४५ हजार रुपये अनुदान दिले जाते. बायोगॅसच्या प्रचार व प्रसिद्धीवरही वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जातात; मात्र त्यानंतरही राज्यभरात १२ व्या पंचवार्षिक योजनेतून उभारल्या गेलेल्या कौटुंबिक बायोगॅस संयंत्र प्रकल्पांपैकी निम्म्यापेक्षा अधिक प्रकल्प वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि अद्ययावत प्रशिक्षणाच्या अभावामुळे बंद पडली आहेत. महाराष्ट्रात अद्याप एकही ‘बायोगॅस डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर’ उभे राहू शकले नाही, हे यामागील मुख्य कारण मानले जात आहे.देशातील मोठ्या शहरांमध्येच मिळतेय ‘बायोगॅस’चे प्रशिक्षणदेशातील ८ मोठ्या शहरांमध्येच सध्या ‘बायोगॅस डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर’ कार्यान्वित आहे. त्यात गुवाहाटी, बेंगलोर, इंदूर, लुधियाना, उदयपूर, कोईम्बतूर, दिल्ली आणि ओडिसा या शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रात कुठेही बायोगॅस संयंत्र प्रकल्प कार्यान्वित करायचा झाल्यास मध्यप्रदेशातील इंदूर येथील प्रा.एस.पी.सिंग संचालित केंद्र गाठावे लागते.