शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या फेरीतूनही अकरावीत प्रवेश नाही

By admin | Updated: August 4, 2016 17:53 IST

पाच प्रवेश फे-या घेवूनही कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नसलेत आम्ही शिकायचं नाही का? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिका-यांसमोर उपस्थित केला.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ४ : अकरावी प्रवेशासाठी पाचवी आॅनलाईन प्रवेश फेरी राबवूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश अद्याप मिळाला नाही. परिणामी विद्यार्थी व पालकांनी गुरूवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी करून संंताप व्यक्त केला. पाच प्रवेश फे-या घेवूनही कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नसलेत आम्ही शिकायचं नाही का? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिका-यांसमोर उपस्थित केला.

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश फेरी राबविली जात असून गुरूवारी पाचव्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. मात्र, दहावीत 82 पासून 88 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही या यादीतून प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी दुपारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली. अकरावीचे वर्ग सुरू होऊन 15 दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला; तरीही आम्हाला प्रवेश मिळात नाही. त्यामुळे आम्ही शिकायचंच नाही का? असा सवाल नेहा पुनम्य या विद्यार्थीनीने रडवेल्या चेह-याने अधिका-यांना विचारला .

82 टक्के गुण मिळविणा-या नेहाने पाचव्या फेरीसाठी आॅनलाईन अर्ज केला.मात्र, तिला घरा जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही.तसेच राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग स्पर्धेपर्यंत खेळणा-या ॠषभ मुरकुटे या विद्यार्थ्याला पाचव्या फेरीत कुठेच प्रवेश मिळाला नाही. आॅनलाईन प्रक्रियेत दोष असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांनी यावेळी सांगितले.