शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांमधील वाद पेटला

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

पर्सेसीन नेट आणि पारंपरिक मच्छीमारांमधील वाद पुन्हा पेटला आहे.

मुंबई : पर्सेसीन नेट आणि पारंपरिक मच्छीमारांमधील वाद पुन्हा पेटला आहे. पर्सेसीन मच्छीमारांवर ५ फेब्रुवारीपासून शासनाने घातलेली बंदी पैसे देऊन उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी शुक्रवारी मस्त्यविकास मंत्र्यांवर केला होता. मात्र बंदी उठवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून तांडेल यांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी दावा दाखल करण्याचा इशारा पर्सेसीन मच्छीमारांच्या संघटनेने सोमवारी दिला आहे.याआधी पर्सेसीन नेट मच्छीमारांवरील बंदी उठवण्यासाठी मस्त्यविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी १५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप तांडेल यांनी केला होता. मात्र त्याबाबतचे पुरावे सादर न करता, एसआयटीने पुरावे शोधून काढण्याचे आवाहन केले होते. मात्र बंदी उठवण्यासाठी सर्व बैठका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू असून तशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केल्याचा खुलासा पर्सेसीने नेट मच्छीमार संघटनेचे उपाध्यक्ष गणेश नाखवा यांनी केला आहे. शिवाय खडसे यांच्या नावाचा प्रसिद्धीसाठी वापर करताना, कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप केल्याप्रकरणी तांडेल यांनी माफी मागितली नाही, तर न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नाखवा यांनी सांगितले.नाखवा म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून मासेमारी बंद असल्याने पर्सेसीन नेट मच्छीमार कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे १५ कोटींचा हफ्ता देणे मच्छीमारांसाठी अशक्य आहे. शिवाय बंदी उठवण्यावरील सर्व चर्चा मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत सुरू आहे. सुरूवातीची पहिली बैठक केवळ खडसे यांच्यासोबत झाली होती. मात्र त्यानंतर खडसे यांच्यासोबत त्यांच्या बंगल्यावर एकही बैठक झालेली नाही.>वाद नकोच...पर्सेसिन व पारंपारिक मच्छिमारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दामोदर तांडेल करत असल्याचा आरोप नाखवा यांनी केला. मात्र तांडेल सारखे नेते राजकारणापायी मच्छीमारांमध्ये वाद घडवत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तरी बंदीची अधिसूचना जारी झाल्यावर येलो गेट पोलीस ठाणे, कुलाबा पोलीस ठाणे आणि बंदर निरिक्षकांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.