शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

युवकांसाठी शिक्षण सुधारणा आणि रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध

By admin | Updated: February 1, 2017 16:00 IST

मनरेगा, रस्ते बांधणी आणि मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांचे प्रकल्प यावर भरीव तरतूद केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1 - मनरेगा, रस्ते बांधणी आणि मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांचे प्रकल्प यावर केलेली भरीव तरतूद तसेच देशाला ‘इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र’ बनवण्याच्या घोषणेमुळे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी भारतीय युवकांच्या पदरात भरभरून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेता डळमळीत असताना केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे भारतीय तरुणांसाठीच्या रोजगाराच्या संधीत वाढ होणार असल्याचे सूतोवाच अरुण जेटलींनी केले आहेत. 

आयआयटी आणि वैद्यकीय शिक्षणासह सर्व प्रकारच्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीच्या परीक्षा घेण्याची एकच पद्धत  निर्माण केली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी ‘राष्ट्रीय परीक्षा बोर्डा’ची स्थापना करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंदांचा दाखला देत देशातील युवाशक्तीला उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता असल्याचे जेटली म्हणाले आहेत. देशातील उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेचे वार्षिक मूल्यमापन, शास्त्र विषयांच्या शिक्षणावर विशेष भर आणि उच्च दर्जाची गुणवत्ता सिद्ध करणारी महाविद्यालये तसेच शिक्षण संस्थांना ‘स्वायत्तता’ देण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) कार्यपद्धतीत मूलभूत बदलांची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेत प्रतिवर्षी जास्तीच्या 5000 जागांची निर्मिती केली जाणार 1. सर्व प्रवेश परीक्षांसाठी केंद्रीय व्यवस्था2. उच्च गुणवत्तेत सातत्य राखणारी महाविद्यालये, शिक्षणसंस्थांना स्वायत्तता3. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधार4. वैद्यकीय शिक्षणासाठी 5000 अधिक जागा