शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर्गत निवडणुका नकोच

By admin | Updated: January 19, 2015 04:48 IST

काँग्रेस पक्षाला मजबूत बनवायचे असेल तर पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत ताबडतोब बंद करण्याची गरज असल्याची आग्रही भूमिका मुंबई काँग्रेसच्या

मुंबई : काँग्रेस पक्षाला मजबूत बनवायचे असेल तर पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत ताबडतोब बंद करण्याची गरज असल्याची आग्रही भूमिका मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. निवडणुकीची ही पद्धत बंद करून पूर्वीची नियुक्ती व सक्रिय कार्यकर्त्यांची पद्धत सुरू करण्याची मागणी नेतृत्वाकडे करण्यात आली आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबईत पक्षसंघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी अलीकडेच बैठक घेतली. तब्बल साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत बहुतांश नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुका थांबविण्याचा आग्रह धरला. पक्षांतर्गत निवडणुकांत अनेकदा जनतेत व पक्षात प्रभाव नसलेली मंडळी निवडून आल्याचे दाखले उपस्थितांनी दिली. अशा पदाधिकाऱ्यांमुळे निवडणुकीत पक्षसंघटनेचा म्हणावा तसा प्रभाव पडला नसल्याचा दावाही केला. यावर कार्यकर्त्यांची भावना केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले. देशभरातूनच पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याच आग्रहाखातर निवडणूक पद्धतीचा अवलंब केल्याने ती मोडीत काढल्यास चुकीचा संदेश जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी निवडणुकीऐवजी बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असे. लोकप्रतिनिधी, प्रस्थापित नेत्यांशी सल्लामसलतीनंतर हायकमांडकडून नावांची अंतिम घोषणा केली जात असे. सहमतीने होणाऱ्या या नियुक्त्यांमुळे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायचा. त्यामुळे पक्ष म्हणून लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे शक्य होते, असा दावा नियुक्तीसाठी आग्रही असणाऱ्या नेत्यांनी केला. मात्र नियुक्तीची पद्धत ठरावीक लोकांच्या फायद्याची असल्याची ओरड होऊ लागल्याने त्याऐवजी निवडणुका घेण्याचा पर्याय पुढे आला. (प्रतिनिधी)