शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दुरंतोचे महाराष्ट्रात अनेक थांबे

By admin | Updated: September 9, 2015 00:28 IST

राजधानी, शताब्दीपेक्षाही सुसाट वेगात विनाथांबा धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसची कमालीची मोहिनी रेल्वेप्रवाशांवर असल्याने, ज्या मार्गावर या ट्रेनची लोकप्रियता तुलन्ोने कमी आहे

- रघुनाथ पांडे,  नवी दिल्लीराजधानी, शताब्दीपेक्षाही सुसाट वेगात विनाथांबा धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसची कमालीची मोहिनी रेल्वेप्रवाशांवर असल्याने, ज्या मार्गावर या ट्रेनची लोकप्रियता तुलन्ोने कमी आहे तिथे उत्पन्न वाढीसाठी थांबे देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. मुंबईतून सुटणाऱ्या १२ आणि महाराष्ट्रातून जा-ये करणाऱ्या १४ दुरंतोंना हा निर्णय एक सप्टेंबरपासून लागू झाला. देशभरातील २७ पैकी २३ दुरंतोंच्या उत्पन्न वाढीसाठी व्यावसायिक थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. पूर्वीचाच वेळ कायम राहावा म्हणून १०० ते ११५ हा पूर्वीचा दरताशी वेग आता वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, लोणावळा, भुसावळ, इगतपुरी, कसारा, बल्लारशा, मनमाड, पनवेल, वसई रोड व रत्नागिरी या ११ स्थानकांवर या मार्गावरून जा-ये करणाऱ्या सर्व दुरंतो थांबत आहेत. दुरंतोच्या लोकप्रियतेचा अभ्यास केल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा भाग म्हणून रेल्वे बोर्ड व मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. जिथे सध्या टेक्निकल हॉल्ट आहे, अशा ठिकाणी व्यावसायिक थांबा दिला गेला आहे.पुणे - हावडा या ट्रेनसाठी मनमाड, भुसावळ व नागपूर, मुंबई - हावडासाठी इगतपुरी, भुसावळ, नागपूर, बिलासपूर, निजामुद्दीन - पुणेसाठी वसई रोड, लोणावळा, रतलाम व कोटा, नागपूर - मुंबईसाठी कसारा व भुसावळ, पुणे - अहमदाबादसाठी वसईराड, मुंबई - नवी दिल्लीसाठी बडोदा, रतलाम, लोकमान्य टिळक टर्मिनस - एर्नाकुलमसाठी रत्नागिरी - मडगाव, चेन्नई - निजामुद्दीनसाठी नागपूर- बल्लारशा, इटारशी, लोकमान्य टिळक टर्मिनस - अलाहाबादसाठी इगतपुरी, भुसावळ, इटारशी, सिकंदराबाद - मुंबईसाठी पुणे, इंदूर - मुंबईसाठी बडोदा, उज्जैन, जयपूर - मुंबईसाठी बडोदा, रतलाम, हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलमसाठी रत्नागिरी, पनवेल, मडगाव या टेक्निकल थांब्यांचा विचार झाला.सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला देशभरात सध्या २७ दुरंतो असून, यापैकी १४ दुरंतो महाराष्ट्राच्या विविध भागांतून जा-ये करतात, तर १२ दुरंतो मुंबईतूनच सुटतात. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील प्रवाशांंना होणार आहे. या सर्वच दुरंतोंना थांबे दिले आहेत.दर्डांकडून प्रभू, सिन्हांचे अभिनंदनदुरंतोची उपयोगिता व ज्या ठिकाणी या ट्रेनला टेक्निकल हॉल्ट दिला आहे, त्या स्थानकांवरून प्रवाशांना चढ-उताराची परवानगी रेल्वेने दिली पाहिजे. यामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढेल, अशी मागणी करणारे पत्र ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी माजी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे व सदानंद गौडा यांना दिले होते. याबाबत पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतल्याने त्यांचे अभिनंदन करणारे पत्र दर्डा यांनी दिले आहे.रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. मुंबईतून सुटणाऱ्या आणि राज्यातून जा-ये करणाऱ्या दुरंतोंना हा निर्णय एक सप्टेंबरपासून लागू झाला.