शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

रँकिंगमध्ये राज्यातील अनेक शैक्षणिक संस्था

By admin | Updated: April 4, 2017 06:51 IST

देशातील १०० महाविद्यालयांच्या मानांकनात (रँकिंग) राज्यातील १० महाविद्यालयांनी स्थान मिळवले आहे.

पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या देशातील १०० महाविद्यालयांच्या मानांकनात (रँकिंग) राज्यातील १० महाविद्यालयांनी स्थान मिळवले आहे. मात्र, पहिल्या २५ महाविद्यालयांच्या यादीत राज्यातील एकाही महाविद्यालयास स्थान मिळवला आले नाही. याशिवाय राज्यातील तीन शिक्षण संस्थांनी देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये (रँकिंग) स्थान मिळवले आहे. आयआयटीने (मुंबई) तिसरे स्थान मिळवले आहे. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी १० महत्त्वाच्या शिक्षण संस्थांच्या दर्जाची यादी जाहीर केली आहे. औषध निर्माण शाखेत मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी चौथा तर पूना कॉलेज आॅफ फार्मसीला आठवा दर्जा मिळाला आहे. पुण्याचे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग आणि बॉम्बे कॉलेज आॅफ फार्मसी यांनाही यादीत स्थान मिळाले आहे. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी विद्यापीठे, महाविद्यालये, तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था यांची मानांकने जाहीर केली. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये दिल्लीचे जवाहरलाल विद्यापीठ व पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठ आहे. पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ देशात १0 व्या क्रमांकावर आहे.देशातील १०० महाविद्यालयांच्या मानांकनात (रॅकिंग) राज्यातील १० महाविद्यालयांनी स्थान मिळवले आहे. मात्र,पहिल्या २५ महाविद्यालयांच्या यादीत राज्यातील एकाही महाविद्यालयास स्थान मिळवला आले नाही. भारती विद्यापीठाच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ इनफर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड बायोटेक्नॉलॉजीने (आरजीआयआयबीटी) देशात ३० वा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुण्यातील फगर््युसन कॉलेज ३५ क्रमांकावर असून अमरावतीचे डिग्री कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन ३६ क्रमांकावर, मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेज ४० क्रमांकावर आहे.तसेच कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेज ५८ क्रमांकावर असून नांदेंडमधील नांदेड एज्युकेशन सोसायटीचे विज्ञान महाविद्यालय ७२ व्या स्थानावर आहे. पुण्यातील सिंबायोसिस कॉलेज आॅफ आर्टस अ‍ॅण्ड कॉमर्स ८१ तर वर्धा जिल्ह्यातील जानकादेवी बजाज कॉलेज आॅफ सायन्स ८८ आणि सांगलीतील भारती विद्यापीठाच्या मातोश्री बायाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय ९९ व्या स्थानावर आहे.>मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ)ने केलेल्या सर्वेक्षणात मुंबई विद्यापीठाचा क्रमवारीत क्रमांक लागला नाही. मुंबई विद्यापीठाच्या कार्यावर आमचा विश्वास आहे. विद्यापीठातर्फे देण्यात आलेला डेटा पुन्हा एकदा तपासण्यात येईल, कोणत्या पद्धतीने प्रेझेन्टेशन करण्यात आले आहे, याचा अभ्यास करण्यात येईल. - लीलाधर बनसोड, उपकुलसचिव (जनसंपर्क), मुंबई विद्यापीठ >गेल्या दोन वर्षांपासून ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँॅकिंग फ्रेमवर्क’तर्फे (एनआयआरएफ) विद्यापीठ, महाविद्यालयांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. हे पाऊल स्वागतार्ह आहे. देशात पहिल्यांदाच अशा पद्धतीने प्रयोग केला आहे. पण, याविषयी शैक्षणिक संस्था, विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती झालेली नाही. मुंबई विद्यापीठाचा या क्रमवारीत क्रमांक वरती नाही, त्यामुळे पाठवलेल्या डेटाचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे फरक पडला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. - राजन वेळुकर, माजी कुलगुरु, मुंबई विद्यापीठ >गेल्या दोन वर्षांपासून ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’मध्ये (एनआयआरएफ) अनेक कला, वाणिज्य, विज्ञान शाखा असलेल्या महाविद्यालयांनी रिपोर्ट दिलेला नाही. मुंबई विद्यापीठाने एन्ट्री कशी पाठविली होती याची कल्पना नाही, त्यामुळे त्यावर काही भाष्य करु शकत नाही. आमच्या महाविद्यालयाने एन्ट्री पाठविली नव्हती. - तुषार देसाई, प्राचार्य, रुपारेल महाविद्यालय >दुसऱ्यांदा रँकिंगशिक्षण संस्थाची रँकिंग दुसऱ्यांदा केली जात आहे. २,९९५ संस्थांच्या मूल्यांकनाच्या आधारावरील रँकिंगमध्ये २३२ महाविद्यालये, १०२४ अभियांत्रिकी, ५४६ व्यवस्थापन संस्था, ३१८ फार्मसी आणि ६३७ पदवी महाविद्यालये समाविष्ट आहेत. इंडिया रँकिंग २०१७ वर्षात ज्या संस्थांत किमान एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांचाच समावेश केला गेला आहे.फर्ग्युसन विद्यालयाच्या गुणवत्तावाढीसाठी संस्थेच्या वतीने सर्वांना विश्वासात घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालय देशात ३५ वा क्रमांक मिळवू शकले.- शरद कुंटे, अध्यक्ष, नियामक मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. भारती विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत आवश्यक पावले उचलली. संशोधनाशी आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे धोरण तयार करून, त्याची योग्य अंमलबजावणी केली. कौशल्य अभ्यासक्रमाबरोबरच नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले. त्याचा विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना फायदा झाला. - शिवाजीराव कदम, कुलगुरू, भारती विद्यापीठ