शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...तर प. महाराष्ट्राच्या ताटात काय उरणार?

By admin | Updated: January 15, 2016 01:05 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची मुळात मागणीच कुणी केलेली नाही; विदर्भातील नेतेच स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहेत; विदर्भ देणे म्हणजे देशाचा तुकडा पाडणे आहे; विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची मुळात मागणीच कुणी केलेली नाही; विदर्भातील नेतेच स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहेत; विदर्भ देणे म्हणजे देशाचा तुकडा पाडणे आहे; विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही; पश्चिम महाराष्ट्राशिवाय विदर्भ जगूच शकत नाही, असे गैरसमज हेतूपुरस्सर पसरविले जात आहेत. या लोकांना भडकविणाऱ्या कल्पना आहेत. प्रत्यक्षात मात्र विदर्भ वेगळा झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काही उरणार नाही, हे सत्य आहे, असे परखड मत राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी गुरुवारी व्यक्त केले.विदर्भ विकास महासभेतर्फे स्व. नाशिकराव तिरपुडे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ ‘बाळासाहेब तिरपुडे आणि विदर्भ’ या विषयावर श्रीहरी अणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राजकुमार तिरपुडे होते.अणे म्हणाले, नागपूर विदर्भातील ८३ संस्थांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे ठराव घेतले आहेत. विदर्भातील अकराही जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशननेही ठराव घेतले आहेत. यावरून सर्वांनाच विदर्भ व्हावा, असे वाटते हे स्पष्ट होते. अ‍ॅड. अणे म्हणाले, आपल्याला विदर्भ राज्य हा रिझल्ट हवा आहे. प्रत्यक्षात स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात बऱ्याच नेत्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जो विदर्भ घेऊन चालतो तोच खरा लीडर आहे. त्यामुळे विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हे आजही आपल्याला लीडर वाटतात, असेही त्यांनी सांगितले. विकासाची मागणी ही भावनिक असू शकत नाही. केळकर समितीने सिंचनाचा आर्थिक अनुशेष संपला असून भौतिक अनुशेष मात्र कायम असल्याचे ते म्हणाले. आपली गरज काय आहे हे पाहून मागणी करायला हवी असे सांगताना नाशिकराव तिरपुडे यांना वास्तविक विकास हवा होता, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.काँग्रेसचे योगदान मोठे : अ.भा. काँग्रेस समितीने १९२० मध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव घेतला होता. विदर्भाच्या चळवळीत काँग्रेसचे योगदान मोठे आहे. विदर्भातील काँग्रेस नेते सत्तेत राहून विदर्भाच्या विकासासाठी झटत राहिले. नाशिकराव तिरपुडे पक्षात राहून विदर्भावर बोलायचे. नितीन राऊतही बोलतात. गडचिरोली, चंद्रपूर भागातील काँग्रेसचे आमदारही विदर्भाचा आवाज बुलंद करताना दिसतात, असेही अ‍ॅड. अणे यांनी सांगितले.जनमतच्या मागणीवर ठाम लोकभावना या जनमतातून कळत असतात. वेगळ्या विदर्भासाठी जनमत घेण्याच्या मागणीवर आपण ठाम आहोत. ५१ टक्के लोकांना विदर्भ नको असेल आम्ही विदर्भाची मागणी सोडून देऊ, असे आव्हानही त्यांनी पुन्हा एकदा कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.