शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

....तर मराठी शाळांचा कणा मोडेल

By admin | Updated: June 20, 2016 03:50 IST

ज्यात मराठी शाळांची संचमान्यता पूर्ण झाली असून, अतिरिक्त शिक्षकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यांचा समावेश बाकी आहे.

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने यंदा मंजूर केलेल्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांवर फेरविचार करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य काँग्रेस शिक्षक सेलने केली आहे. मराठी शाळांच्या परिसरात नव्या इंग्रजी शाळांना परवानगी दिल्याने मराठी शाळा बंद पडण्याची भीती सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मराठी शाळांच्या ५ कि.मी. परिसरात इंग्रजी शाळांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.राज्यातील शिक्षण सम्राटांकडून स्वयंअर्थसहाय्यित स्वरूपात पहिली ते बारावी इयत्तेच्या नव्या शाळा सुरू करण्यासाठी आणि दर्जावाढ करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे एकूण ५ हजार २३६ प्रस्ताव आले होते. त्यातील ३ हजार ७४३ नवीन शाळांना परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नव्या शाळा आणि दर्जावाढ मिळालेल्या एकूण ८९ शाळा या मुंबईतील आहेत. मात्र, चिंताजनक बाब म्हणजे, या ८९ शाळांमध्ये मराठी माध्यमाची एकही नवी शाळा नाही, तर दर्जावाढीसाठी केवळ एका शाळेला मंजुरी मिळाली आहे.गेल्या वर्षात सरकारने सुमारे १,०१९ इंग्रजी व केवळ ५३ मराठी शाळांना परवानगी दिली होती. या वर्षी राज्यात ३,७४३ नव्या शाळा व दर्जा वाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी नवीन इंग्रजी शाळांची संख्या १,७७९ इतकी आहे, तर मराठी शाळांचा आकडा ८८८ इतका आहे. म्हणजेच इंग्रजी शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षणासाठी विशेष धोरण आखण्याची गरज आहे.ज्यात मराठी शाळांची संचमान्यता पूर्ण झाली असून, अतिरिक्त शिक्षकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यांचा समावेश बाकी आहे. मागील वर्षातील अतिरिक्त शिक्षकांचा अद्याप समावेश झाला नसल्याने, त्यांना काम न करता वेतन देण्यात येत आहे. कारण रिक्त पदापेक्षा अतिरिक्त शिक्षकांची संख्या जास्त आहे.