शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

...तर स्वप्निलचे प्राण वाचले असते

By admin | Updated: July 21, 2016 02:50 IST

अल्पवयीन प्रेमप्रकरणातून एकाचा बळी गेल्याची घटना मंगळवारी रात्री नेरूळ येथे घडली.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- अल्पवयीन प्रेमप्रकरणातून एकाचा बळी गेल्याची घटना मंगळवारी रात्री नेरूळ येथे घडली. या घटनेला जातीवाद मुख्य कारणीभूत असला तरी बघ्याच्या भूमिकेतील नागरिक आणि पोलीस यंत्रणेचा गाफीलपणा हा देखील तितकाच जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. जर एकातरी ठिकाणावरून पीडित कुटुंबाला मदत मिळाली असती, तर कदाचित हा प्रकार घडला देखील नसता. अवघ्या पंधरा वर्षांचा स्वप्निल आणि चौदा वर्षांची त्याची आर्ची (बदललेले नाव) या दोघांचे आठवीपासून एकमेकांवर प्रेम होते असे समजते. त्यांना एकमेकांची जात माहिती नव्हती किंवा माहिती असली तरी समाजाची भावना त्यांना ज्ञात नसावी. शाळेत एकत्र, क्लासही एकच तर कॉलेजही एक असावे यासाठीही त्यांचा प्रयत्न होता. परंतु केवळ जात म्हणजेच प्रतिष्ठा करून बसलेल्या त्या आर्चीच्या कुटुंबीयांना त्यांची मुलगी दुसऱ्या जातीतील स्वप्निलच्या प्रेमात असल्याचे पचनी पडले नाही. त्या दोघांना वेगळे करण्यासाठी वाटेल ते करण्याचे त्यांनी ठरवले आणि मंगळवारची रात्र स्वप्निलची शेवटची रात्र ठरली. त्याचा तो कॉलेजचा पहिलाच दिवस होता.बहिणीच्या प्रियकराचा काटा काढायचाच या भावनेतून त्या आर्चीच्या भावाने स्वप्निलचे अपहरण करून धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो ८ ते १० साथीदारांना घेवून स्वप्निल राहत असलेल्या एसबीआय कॉलनीत घुसला. तिथे थेट स्वप्निलच्या कुटुंबीयांना बळजबरीने इमारतीच्या टेरेसवर नेवून खाली टाकण्याची धमकी तो देत होता. यादरम्यान इमारतीमधील रहिवासी जरी सोनावणे कुटुंबीयांच्या मदतीला आले असते, तर त्या प्रिन्सचे एवढे धाडस देखील झाले नसते. दुर्दैवाने तसे झाले नाही व हा प्रिन्स स्वप्निलच्या कुटुंबीयांचे अपहरण करुन घेवून जाण्यात यशस्वी ठरला. एरवी एसबीआय वसाहतीमध्ये जायचे म्हटले तरी सुरक्षा यंत्रणेच्या हजार चौकशांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये त्याठिकाणी ते गुंड घुसले कसे हा देखील मोठा प्रश्न आहे. मुळात स्वप्निलचे अपहरण होवून धमकी मिळालेली, त्याचवेळी पोलिसांनी गांभीर्याने घेणे गरजेचे होते. तसे झाले असते तर हा प्रकार घडलाच नसता. परंतु ज्या उद्देशाने खाकी वर्दी घातलीय, त्या कर्तव्याचाच विसर पडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील संकटकाळी त्यांना मदत नाकारली. शिवाय मुलीच्या कुटुंबापासून तुमची सुटका कोणीच करू शकणार नाही, असाच भास करून दिला. त्यामुळे जीवन आणि मरणाच्या मध्ये गुंतून राहण्यापेक्षा परिस्थितीला सामोरे जात मुलीच्या कुटुंबीयांपुढे हात टेकणे हाच पर्याय त्यांनी मान्य केला. परंतु त्यातही त्यांचा घात झाला. माफीच्या बहाण्याने घरी नेल्यानंतर स्वप्निल व त्याच्या आई- वडिलांवर २५ ते ३० जणांनी हल्ला चढवला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या स्वप्निलला मोठ्या आशेने रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.>पोलिसांची भूमिका संशयास्पदस्वप्निलचे अपहरण होवून धमकी मिळालेली, त्याचवेळी पोलिसांनी गांभीर्याने घेणे गरजेचे होते. पोलिसांनी या प्रकाराकडे गांभार्याने घेतले असते तर हा प्रकार घडलाच नसता. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील संकटकाळी त्यांना मदत नाकारली. शिवाय मुलीच्या कुटुंबापासून तुमची सुटका कोणीच करू शकणार नाही, असा भास करून दिला.