शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

...तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल

By admin | Updated: May 5, 2017 04:22 IST

वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे मुंबई महापालिकेचे अस्तित्व संकटात येणार असेल तर शिवसेनेला वेगळा विचार करावा लागेल

मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे मुंबई महापालिकेचे अस्तित्व संकटात येणार असेल तर शिवसेनेला वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पुन्हा भाजपावर निशाणा साधला. जीएसटीबाबत सेनेची भूमिका स्पष्ट आहे. पालिकेला लाचार होऊन केंद्र व राज्य सरकार दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर ते चालणार नाही, असे त्यांनी बजावले. मुंबईमध्ये आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. जीएसटीसाठी लवकरच राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जीएसटीमुळे मुंबई महापालिकेला जकातच्या माध्यमातून मिळणारा महसूल बंद होणार आहे. जीएसटीतून केंद्र सरकारकडून येणारा निधी राज्य सरकारने थेट महापालिकेला देण्याची गरज आहे. यासंदर्भात जीएसटी अधिवेशनात पाठपुरावा करू. महापालिका अबाधित राहिली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. भिकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारी उभे राहावे लागणार असेल, तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला. सेना आमदारांच्या बैठकीतही जीएसटीबाबत चर्चा झाली. या वेळी जकात नाक्यामुळे प्रत्येक नाक्यावर गाड्यांची तपासणी होत होती. त्यामुळे सुरक्षाही राखली जात होती. आता जीएसटीमुळे जकात बंद होणार असल्याने सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफी आणि अन्य प्रश्नांवरून भाजपाला कोंडीत पकडण्याची शिवसेनेने राज्यव्यापी अभियानाची तयारी चालविली आहे. ७ मे रोजी औरंगाबाद येथील जाहीर सभेने सेनेच्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात मराठवाडा नंतर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातही अभियान चालविले जाणार आहे. शिवसेना आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देतानाच पक्षसंघटना बांधणीवर जोर देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)