शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

फिर वही दिल लाया हॅूँ...

By admin | Updated: October 20, 2014 00:38 IST

‘जयाभाव’च्या पाण्यात विरोधकांच्या गटांगळ्या : काका पक्षापेक्षा मोठे नव्हे... शंभूराजच्या गुंडगिरीचा बागुलबुवा जनतेनेच संपविला!

सचिन जवळकोटे - सातारा--टेबलावर हातोडा पडल्यावर जशी आजूबाजूची काच तडकत जाते; तसं ‘मोदी तडाखा’ बसल्यानंतर पुणे, सांगली अन् कोल्हापूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडासाफ झाला... पण या त्सुनामी लाटेतही साताऱ्याचा बालेकिल्ला मात्र अभेदय राहिला. राष्ट्रवादीचे ‘पाच पांडव’ अन् काँग्रेसचे ‘राम-लक्ष्मण’ पुन्हा एकदा ‘जायंट किलर’ ठरले. मात्र, शिवसेनेच्या ‘अभिमन्यू’नंही सत्तेचा चक्रव्यूह भेदून काढला.‘साताऱ्यात ओन्ली वन राजे’ हे परवलीचं वाक्य शिवेंद्रसिंहराजेंनी पुन्हा एकदा सार्थ करून दाखविलं. बाबाराजेंच्या शब्दाला मान देऊन सातारा-जावळीकरांनी मनापासून ‘पाहुण्यांना बाय-बाय’ केलं. ‘साताऱ्यात दिवाळी’ साजरी करायला आलेले ‘मुंबईकर’ पुन्हा आपल्या गावी निघून गेले; मात्र पवारांच्या दिपकनं मिळविलेली मतं राजेंच्या भवितव्यासाठी नक्कीच धोकादायक. गेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटलांना २१ हजार मतं पडली होती, यावेळी ही तब्बल अडीचपटीनं वाढली. ५० हजार मतं घेऊन पवार दुसऱ्या स्थानी राहिले. ‘एवढी कामं करूनही असं कसं झालं,’ याचं आत्मपरीक्षण बाबाराजेंनी नक्कीच केलं असावं. म्हणूनच वाढलेल्या ‘कट मिशी’वर ताव मारत त्यांनी आजच पत्रकारांना सांगितलं की, ‘याद राखाऽऽ माझ्याजवळही दगडं आहेत!’वाईत मकरंद पाटलांची चावी पुन्हा एकदा परफेक्ट बसली. मदनदादांची सारी गणितं मोडीत काढून त्यांनी ३८ हजारांचा लीड घेतला. गेल्यावेळेपेक्षा जवळपास सोळा हजारांनी आकडा वाढला. आबांनी यंदा विकासावर अधिक भर दिला तर दादांची विश्वासार्हता कमी पडली. ‘प्रत्येक वेळी आपल्या कार्यकर्त्यांना गृहीत धरून काम करता येत नाही,’ हा संदेशही लोकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचविला. त्यामुळं यापुढं कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच राजकीय निर्णय घेण्याची सवय त्यांना लावून घ्यावी लागेल.फलटणमध्ये तर दिगंबर आगवणेंच्या चमत्कारीक ‘कसरती’मुळं रामराजे गटाला रान मोकळं मिळालं होतं. हातातोंडाशी चालून आलेला आयता घास दूर सारण्याची महाघोडचूक करणाऱ्यांना फलटणकरांनी शेवटपर्यंत उपाशीच ठेवलं. अशातच, सोनवलकरांना झेड्पी अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीनं खूप छान खेळी केली. असो, लोकसभेच्या पराभवाचं उट्टं काढल्यामुळं रामराजे सुखावले. बारामतीकरांच्या नजरेत त्यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा वाढली. त्याचा फायदा जिल्ह्याच्या राजकारणात करून घ्यायला ते आता तयार असतीलच.‘माण-खटाव’मध्ये मात्र ‘कपबशी’ची स्वप्नं खळ्ळऽऽकन फोडून ‘जयाभाव’चा ‘हात’ अधिकच मजबूत झाला. राष्ट्रवादीच्या साध्या सरपंचापासून ते शरद पवारांपर्यंत साऱ्यांनीच त्यांच्या पराभवासाठी देव पाण्यात ठेवले होते; परंतु ‘जयाभाव’नं आणलेल्या ‘उरमोडी’च्या पाण्यात सारे विरोधक गटांगळ््या खात बुडाले. आजपावेतो जाती-पातीच्या राजकारणात अडकलेल्या इथल्या जनतेनं प्रथमच विकासाला भरभरून मत दिलं. गुदगे-येळगावकरांसारख्या ‘भूमिका बदलू’ नेत्यांनाही जनतेनं स्पष्टपणे वास्तवाची जाणीव करून दिली.कोरेगावात तर शशिकांत शिंदे खऱ्या अर्थानं ‘जायंट किलर’ ठरले. बेरजेच्या राजकारणात आपण किती सरप्लस आहोत, हे त्यांनी ४७ हजारांच्या लीडवरून दाखवून दिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शिंदेंनी उदयनराजेंशी केलेली युती जिल्ह्याच्या राजकारणाला भलतीच कलाटणी देणारी. या दोन नेत्यांचं एकत्र येणं, विरोधकांसाठी (पक्षातल्याही) मती गुंग करणारं अन् पोटशूळ उठविणारी.‘कऱ्हाड उत्तर’मध्ये बाळासाहेबांनी मैदान मारलं असलं तरी गेल्यावेळेपेक्षा निम्म्यावर आलेला लीड त्यांच्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा वाजविणारा. गेल्यावेळी पक्ष सोबत नसतानाही त्यांनी एकट्याच्या जीवावर ४२ हजारांची आघाडी घेतलेली; परंतु आजचा निकाल पाहता कार्यकर्त्यांचीही चुळबूळ वाढलेली. त्यांनी आतून काँग्रेसशी संधान साधल्यानं त्यांना एवढा तरी विजय मिळविता आला; परंतु स्वत:च्या फायद्यासाठी पृथ्वीराज बाबांशी वाढविलेली सलगी म्हणे अजितदादांच्या डोक्यात बसलीय! असो, ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’ करण्याऱ्या पक्षाच्या संस्कृतीतच बाळासाहेब वाढलेले. त्यात या बिच्चाऱ्या आमदारांचा तरी काय दोष?‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये मात्र पृथ्वीराज बाबांनी काकांची पुरती वाट लावून टाकली. तब्बल सातवेळा आमदार झालेल्या काकांना त्यांनी शेवटी घरी बसवलं. ‘कोणताही नेता पक्षाच्या जीवावर मोठा होतो. पक्षापेक्षा नव्हे!’ या राजकीय समीकरणाची जनतेनेच जाणीव करून दिली. बाबांनीही ‘जनाधार नसलेला नेता’ हा आपल्यावरचा डागही पुसून काढला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कऱ्हाडकरही अखेरपर्यंत अठराशे कोटींच्या विकास कामाला जागले.शेजारच्या पाटण मतदारसंघात संध्याकाळचे पाच वाजले तरीही निकाल लवकर लागत नव्हता. नेहमी घोड्यावर बसणाऱ्या नेत्यांच्या तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेनं मात्र खूप वेळ लावला. अधिकाऱ्यांचंही बरोबरच की होऽऽ. थोडीशी जरी चूक झाली तरी लगेच तक्रार करायला दोन्ही गट मोकळे. पत्रकं काढायला नेतेही तयारच. या ठिकाणी शंभूराजनी घेतलेली आघाडी भलतीच धक्कादायक. डोळे विस्फारणारी. पाटणकरांच्या हक्काच्या टापूत त्यांनी मारलेली मुसंडी अत्यंत लक्षणीय. त्यांच्या तथाकथित गुंडगिरीचा अन् विश्वासघातकी राजकारणाचा तालुक्यात उभा केलेला बागुलबुवा अखेर जनतेनंच नष्ट केला!