शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

...तर दंडाधिकाऱ्यांना अहवाल द्या

By admin | Updated: May 6, 2016 02:22 IST

पोलीस कोठडीत असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास किंवा एखादा गायब झाल्यास तसेच महिलेवर बलात्कार झाल्यास तातडीने दंडाधिकारी ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेटकडे अहवाल सादर

मुंबई : पोलीस कोठडीत असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास किंवा एखादा गायब झाल्यास तसेच महिलेवर बलात्कार झाल्यास तातडीने दंडाधिकारी ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेटकडे अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आणि कारागृहांना द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. दंडाधिकारी व ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेटपुढे अहवाल सादर केल्यानंतर अशा घटनांची फौजदारी दंडसंहिता कलम १७६ (१ए) अंतर्गत तत्काळ चौकशी होईल, असे न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांनी म्हटले. पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास सीआरपीसी कलम १७६ (१ए) अंतर्गत दंडाधिकाऱ्यांना मृताचे शव २४ तासांत शवविच्छेदनासाठी पाठवून मृत्यूचे कारण जाणणे बंधनकारक आहे. त्यामुळे दंडाधिकाऱ्यांना तातडीने माहिती न दिल्यास कायद्याची अंमलबजावणी होणार नाही. सीआरपीसी कलम १७६ (१ए) केवळ कागदावरच राहील. त्यामुळे असे प्रकार दंडाधिकाऱ्यांना तातडीने कळवावेत. त्यामुळे राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आणि कारागृहांना सहा आठवड्यांत हे आदेश द्यावेत, असे न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांनी म्हटले. ‘दंडाधिकाऱ्यांना वेळीच माहिती दिल्यास संबंधित पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यासाठी दंडाधिकाऱ्यांनी चौकशीला विलंब केला, ही सबब देता येणार नाही,’ असे खंडपीठाने म्हटले.पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याबद्दल अनेक आरोपींच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील एकत्रित सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने वरील निर्देश सरकारला दिले. देशातील एकूण कोठडी मृत्यूपैकी २३. ४८ टक्के कोठडी मृत्यू एकट्या महाराष्ट्रात होतात, हे गांभीर्याने घेत उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)